NEET UG Re-test 2024 Admit Card: NTA कडून 1563 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेसाठी हॉल तिकीट्स जारी

1563 विद्यार्थ्यांसाठी सहा शहरांमध्ये पुन्हा नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे

Online | Pixabay.com

NTA कडून 1563 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा घेण्यात येणार्‍या नीट परीक्षेसाठी नवीन हॉलतिकीट्स जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ही हॉल तिकीट्स exams.nta.ac.in/NEET वर उपलब्ध होणार आहेत. अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारखेवरून लॉगिन करावं लागणार आहे. आता ही परीक्षा 23 जून दिवशी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा केवळ वेळ वाया गेल्याने ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा घेण्यात येणार आहे.

दरम्यान एनटीए कडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूळ मार्क्स ग्राह्य धरले जातील किंवा त्यांना नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे. ग्रेस मार्क्सवरून देशभर आवाज उठवण्यात आला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये यामध्ये हस्तक्षेप करत पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा थेट आदेश या उद्देशासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने सादर केलेल्या अहवालाप्रमाणेच आहे.

1563 विद्यार्थ्यांसाठी सहा शहरांमध्ये पुन्हा नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील बालोद आणि दंतेवाडा येथील प्रत्येकी एक आणि सूरत, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि बहादूरगडमधील प्रत्येकी एक परीक्षा केंद्रावर या परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे. 

NEET UG Re-test 2024 admit card कसं कराल डाऊनलोड?

दरम्यान NEET UG 2024 च्या पुर्नपरीक्षेबाबतचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट तुम्ही वेळो वेळी पाहणं आवश्यक आहे.