NEET PG 2021 Admit Card जारी; natboard.edu.in वरून अशी करा डाऊनलोड
या दिवशी देशभरातील 202 शहरांमध्ये परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी पेपर- पेन मोड मध्ये परीक्षा देणार आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजेंसी (National Testing Agency) कडून 6 सप्टेंबरला यंदा NEET UG Admit Card 2021 जारी करण्यात आली आहेत. यावर्षी नीट ची परीक्षा देणार्यांना ही अॅडमीट कार्ड्स अधिकृत संकेतस्थळ neet.nta.nic.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील विद्यार्थ्यांना त्यांची अॅडमीट कार्ड्स पोस्टाद्वारा दिली जाणार नाहीत.
उमेदवारांना त्यांची अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर आणि बर्थ डेट / जन्मतारीख द्यावी लागणार आहे. यंदा नीट परीका 12 सप्टेंबर दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी देशभरातील 202 शहरांमध्ये परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी पेपर- पेन मोड मध्ये परीक्षा देणार आहेत. नक्की वाचा: NEET SS Exam 2021: नीट एसएस 2021परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून करता येईल अर्ज.
कसं डाऊनलोड करा अॅडमीट कार्ड
- natboard.edu.in ला भेट द्या.
- NEET PG 2021 admit card या लिंक वर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन डिटेल्स भरून सबमीट बटन वर क्लिक करा.
- तुमचं अॅडमीट कार्ड डाऊनलोड करा.
- तुमच्या अॅडमीट कार्ड ची प्रिंट आऊट काढा.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना फेस शिल्ड, फेस मास्क आणि सॅनिटायझर सॅशे परीक्षा केंद्रावर दिला जाणार आहे. NBEMS कडून विद्यार्थ्यांना कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.