Temple Management Course In MU: मुंबई विद्यापीठाचा Oxford Centre सोबत 'मंदिर व्यवस्थापन' कोर्स साठी करार

सर्टिफिकेट कोर्सचा भर हिंदू तत्त्वज्ञानाच्या सखोल अभ्यासावर असणार आहे.

Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) आता ऑक्सफोर्ड (Oxford Centre) सोबत मिळून विद्यार्थ्यांसाठी टेंपल मॅनेजमेंटचा (Temple Management) नवा कोर्स आणला आहे. यासाठी त्यांच्यामध्ये करार  झाल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे. हिंदू शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांसाठी आता टेंपल मॅनेजमेंट या नव्या कोर्सचा पर्याय देखील खुला झाला आहे. यामध्ये अनेक डिप्लोमा आणि सर्टिफिकेट लेव्हल कोर्स आहेत. विद्यार्थ्यांना हे ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात देखील शिकता येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचे हिंदू स्टडीज आणि संस्कृत विभाग यांच्या समवेत विद्यापीठाने Oxford Centre सोबत करार केल्याचं आता जाहीर केले आहे. या कोर्समध्ये हिंदूशास्त्राचा अभ्यास केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे समन्वयक म्हणून रविकांत सांगुर्डे आणि माधवी नरसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नक्की वाचा: Mumbai University आता डिजिटली उपलब्ध करणार पदवीची प्रमाणपत्र; पहा कुठे पाहता येणार ही सर्टिफिकेट्स .

भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आता मोठे बदल केले जाणार आहेत. प्राचीन आणि अत्याधुनिक काळामधील फरक आता भरून काढला जाणार आहे. प्रत्यक्ष मंदिरातील मॅनेजमेंटचा विद्यार्थ्यांना यामध्ये अभ्यास करता येणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट या दोन मॅनेजमेंट स्कूल्सच्या सहाय्याने तयार केला जाईल अशी देखील माहिती देण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif