Mumbai University Exam 2022: मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापिठाच्या परिक्षा रद्द, जाणून घ्या कसं असेल परिक्षेचं नवीन वेळापत्रक
मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University Exams) विविध शाखेतील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रद्द झालेल्या या परिक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार असा प्रश्न विद्यार्थांना पडला होता तरी मुंबई विद्यापिठाकडून आता परिक्षेच नवीन वेळापत्रक (Time Table) जाहिर करण्यात आलं आहे.
गेल्या आठवडाभरापासून मुंबईत (Mumbai) धोधो पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून (Weather Forcasting Department) मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला होता. याच पार्श्वभुमिवर मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University Exams) विविध शाखेतील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रद्द झालेल्या या परिक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार असा प्रश्न विद्यार्थांना पडला होता तरी मुंबई विद्यापिठाकडून आता परिक्षेच नवीन वेळापत्रक (Time Table) जाहिर करण्यात आलं आहे. परिक्षेसंबंधी संभ्रमात असणाऱ्या विद्यार्थासाठी ही दिलासादायक बातमी आहे.
मुंबई विद्यापीठकडून (Mumbai University) अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी (Pharmacy) आणि एसएससी फायनान्सच्या (SSC Finance) एकूण 9 विषयांचे पेपर रद्द करण्यात आले होते. तर आता या तिन्ही शाखेतील विद्यार्थांचे हे 9 पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापिठाकडून देण्यात आली आहे. पुन्हा घेणार असलेल्या परिक्षेत कम्युनिकेशन स्किल्स (Communication Skills), बिझनेस कम्युनिकेशन एथिक्स-I (Bussiness Communication Ethics 1), फायनान्शिअल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट (Financial Accounting and Management), एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट , बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट (Business Infrastructure and Management), ईआरपी (ERP), एथिक्स आणि सीएसआर (Ethics and CSR), फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज (Field Income Security), क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि इम्युनोपॅथॉलॉजी या विषयांची समावेश आहे. (हे ही वाचा :-ICAI CA Final Results 2022: CA Final May परीक्षेचा निकाल icai.nic.in वर जाहीर; असे पहा गुण!)
रद्द करण्यात आलेल्या या परिक्षा मुंबई विद्यापिठाकडून 18 जुलै म्हणजे सोमवारी आणि 19 जुलै म्हणजे मंगळवारी घेण्यात येणार आहे. तरी नव्या वेळापत्रकाबाबतची संपूर्ण माहिती मुंबई विद्यापिठाच्या अधिकृत वेबसाईटवर (Website) देण्यात आली आहे. नव्या परीक्षा वेळापत्रकाबाबत विद्यार्थांनी सोशल मिडीयावर (Social Media) फिरणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये असे विद्यापिठाकडून सांगण्यात आले आहे. तसेच परिक्षेचं वेळापत्रक बदललं असलं तरी परीक्षा केंद्र (Exam Center) होती तीचं असणार आहेत. परिक्षा केंद्रात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही अशी माहीती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)