Mumbai Suburban Job Opportunity: मुंबई उपनगरात सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर अर्ज प्रक्रीया

मुंबई उपनगरात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात बेरोजगारीने (Unemployment) उच्चांक गाठला आहे. रोज हजारोंच्या संख्येने लोक मुंबईत (Mumbai) नोकरी (Job) मिळवण्या करीता येतात. पण नोकरीच्या संधी (Job Opportunity) कमी आहेत दर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या जास्त. पदवी पुर्ण करुनही हल्ली कित्येक तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहे. त्यात सरकारी (Government Job) आणि खासगी (Private Job) असे दोन पर्याय नोकरीसाठी उपलब्ध आहे. पण खासगी नोकरी कायमस्वरुपी नसते तसेच शैक्षणिक (Educational Qualification) पात्रता असुनही त्यात पगाराची मारामार असते. म्हणून अधिक तर तरुण तरुणी सरकारी नोकरीला (Government Job) अधिक प्राधान्य देताना दिसतात. त्यात मुंबईसारख्या (Mumbai) महागड्या शहरात राहण्यासाठी नोकरी असणं अनिवार्य आहे. तरी मुंबई उपनगरात (Mumbai Suburban) सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे (Thane) येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (Medical Officer) विविध पदांसाठी पदभरती केल्या जाणार आहे. यात स्टाफ नर्स (Staff Nurse), फार्मासिस्ट (Pharmasist), ANM, लॅब टेक्निशियन अशा एकूण 91 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी B.Sc नर्सिंग (Nursing)/ GNM, फार्मासिस्टसाठी B.Pharm/ D.Pharm, ANM साठी 10वी पास (SSC), ANM कोर्स उत्तीर्ण, लॅब टेक्निशिय़नसाठी DMLT सब B.Sc. या प्रमाणे असावी.संबंधीत पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे. तर www.zpthane.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर (website) जावून इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. (हे ही वाचा:- All India Radio Job Opportunity: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात नोकरीची संधी, करा आजचं अर्ज)

 

तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) नोकरीची उत्तम संधी आहे. अभियंता पदासाठी एकूण तेरा जागांची भरती करण्यात येणार आहे. संबंधीत पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे. तरी ऑनलाईनसह (Online) ऑफलाईन (Offline) पध्दतीने उमेदवार या पदाकरीता अर्ज करु शकतात. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं शिक्षण सिव्हिल (Civil ),मेकॅनिकल (Mechanical) किंवा इलेक्ट्रिकल (Electrical) या शाखेतून इंजिनिअरिंग (Engineering) पदवीधर असणे अनिवार्य आहे.