MU Winter Session 2021 Exam Dates: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा तारखा जाहीर

त्यामध्ये MCQs स्वरूपातील प्रश्नावली असेल.

mumbai university (pic credit - mumbai university twitter)

University Of Mumbai Exam Dates:  12वीचे निकाल लागल्यानंतर यंदा ऑनलाईन पद्धतीनेच पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या राज्यात 13 वी पासून पुढचे वर्ग सुरू झाले आहेत. दरम्यान सोमवारी (27 सप्टेंबर) मुंबई विद्यापीठाने (University Of Mumbai) प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट वर्गांच्या हिवाळी सत्रातील परीक्षांचं वेळापत्रक (Winter Session Exam Dates) देखील जारी केलं आहे. BA, BCom आणि BSc वगळता इतर कोर्ससाठी प्रश्नपेढी जाहीर केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून कॉलेजला देण्यात आलेल्या परिपत्रकात दिली आहे.

कॉलेजामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुलभ व्हावं आणि एकवाक्यता राहावी म्हणून प्रश्नपेढी सारखीच दिली जाणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी देखील विशिष्ट फॉरमॅट दिला जाणार आहे. नक्की वाचा: मुंबई विद्यापीठाला NAAC कडून A++ मानांकन; Uday Samant यांच्याकडून कौतुक.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील परीक्षा ऑनलाईन मोड वरच घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये MCQs स्वरूपातील प्रश्नावली असेल. Engineering, MCA आणि Pharmacy सारख्या टेक्निकल कोर्स मध्ये थिअरी पेपर 80 मार्कांचा हा विभागला जाईल. त्यामध्ये 20 मार्कांचे MCQs आणि अन्य 60 मार्कांचे सविस्तर उत्तरांचे प्रश्न असतील. architecture च्या विद्यार्थ्यांसाठी सविस्तर उत्तरांचे प्रश्न आणि डिझाईन बेस्ड प्रश्न यांच्याकरिता प्रश्नपत्रिकेमध्ये काही बदल केले जाणार आहेत.

BE, B Pharm, B Arch, M Arch, Law (3 आणि 5 वर्षांचे कोर्स) आणि MCA batchesच्या परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. Architecture Batches च्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात सुरू होतील तर बीई आणि फार्मसी च्या परीक्षा नोव्हेंबर मध्ये होणार आहेत. लॉ च्या परीक्षा डिसेंबर महिन्यात आयोजित केल्या आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र 5 च्या परीक्षा 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021 दरम्यान होतील.