Maharashtra Board HSC Result 2020: बारावीचा निकाल 90.66 %, कोकण विभागाने मारली बाजी
एकूण निकाल 90.66 % लागला असून नऊ विभागांमध्ये कोकणाने बाजी मारली आहे.
MSBSHSE 12th Results 2020: महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांना असलेली 12वीच्या परीक्षा निकालाची (HSC Results) प्रतिक्षा आता संपली आहे. राज्यात महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून आज (16 जुलै) दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी शिक्षण मंडळाने परिपत्रक जाहीर करत आता नऊ विभागाच्या मंडळांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये कोकण विभागाने मारली आहे. बारावीचा राज्यातील एकूण निकाल 90.66 % लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के इतका लागला, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) लागला. Maharashtra Board 12th Result 2020: बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर; mahresult.nic.in वर पहा तुमचे मार्क्स!
यंदा बारावी निकालामध्ये मुलींचा निकाल अधिक लागला आहे. तर शिक्षण मंडळाच्या विभागामध्ये सर्वात कमी निकाल औरंगाबाद या विभागाचा लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic.in वर पाहता येणार आहे.
ANI Tweet
विभगानुसार निकाल
कोकण – 95.89 टक्के
पुणे – 92.50 टक्के
कोल्हापूर – 92.42 टक्के
अमरावती – 92.09 टक्के
नागपूर – 91.65 टक्के
लातूर – 89.79 टक्के
मुंबई –89.35 टक्के
नाशिक – 88.87 टक्के
औरंगाबाद – 88.18 टक्के
शाखानिहाय निकाल किती टक्के?
विज्ञान – 96.93 टक्के
वाणिज्य – 91.27
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – 86.07
कला – 82.63
दरम्यान यंदा महाराष्ट्रात 12वीची परीक्षा 5 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी दिली आहे. यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली आहे. ही परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पार पडली आहे. सार्या विषयाचे पेपर सुरळीत पार पडले आहेत. मात्र पेपर तपासणीचे आणि निकाल लावण्याचे काम लांबणीवर पडले होते.
यंदा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शास्त्रामध्ये पुढील शिक्षण घेणार्यांसाठी आवश्यक जेईई, नीट परीक्षा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे त्याच्या परीक्षा, निकाल लागल्यानंतर आता पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू होईल.