MPSC 2020 Exam Revised Dates: जाणून घ्या 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती; 14 मार्च 2021 रोजी होणार राज्य सेवा पूर्व परीक्षा

आता ही पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. यासह महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 आता 27 मार्च 2021 रोजी होणार आहे

MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पूर्व परीक्षा 2020 (MPSC Prelims) ची सुधारित तारीख जाहीर केली आहे. यापूर्वी ही परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार होती. आता ही परीक्षा 14 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी 23 डिसेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र विभाग सेवा परीक्षा विविध विभागांच्या गटविकास अधिकारी, पोलिस उपअधीक्षक इ. मध्ये भरतीसाठी आयोजित केली जाईल. एकूण 200 पदांवर भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. पूर्व परीक्षामध्ये सामान्य अभ्यास आणि नागरी सेवा योग्यता चाचणी असे दोन पेपर्स असतील.

राज्य प्रशासनात ‘गट अ, ब आणि क’ आणि अन्य स्तरावर भरतीसाठी एमपीएससी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 साठी फेब्रुवारी 2020 मध्ये जाहिरात निघाली होती. आता ही पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. यासह महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 आता 27 मार्च 2021 रोजी होणार आहे. यासाठी 18 मार्च 2020 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर अशाप्रकारे 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे हे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती आहे. याशिवाय एमपीएसने अजूनतरी कोणत्याही परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या नाहीत.  या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वेळापत्रक पाहू शकता.

दरम्यान, याआधी भाजपा खासदार छत्रपती संभाजी यांनी कोविड-19 च्या दृष्टीने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. नोकरी व शिक्षणात आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजातील सदस्यांसमवेत झालेल्या बैठकीत राज्यसभा खासदार म्हणाले होते की, परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या नाहीत तर मराठा विद्यार्थी परीक्षा केंद्राची तोडफोड करतील. ते पुढे म्हणाले की, ही परीक्षा 200 जागांसाठी घेतली जात आहे पण सुमारे दोन लाख लोक यात सहभागी होतील.