MHT CET 2024 Result Date: महाराष्ट्र सीईटी चा PCM/PCB ग्रुपचा पहा निकाल कधी? cetcell.mahacet.org असे पहा स्कोअरकार्ड
Provisional Answer Key 21 मे दिवशी जारी करण्यात आली असून 25 मे पर्यंत त्यावरील आक्षेप स्वीकारण्यात आले आहेत.
महाराष्ट्र स्टेट कॉमन एंटरन्स टेस्ट सेल (The Maharashtra Common Entrance Test Cell) कडून यंदाच्या MHT CET 2024 Result च्या निकालाची प्रतिक्षा आहे. अधिकृत परिपत्रकानुसार, हा निकाल 19 जून किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट देऊन पर्सनल लॉगिन डिटेल्स देऊन त्यांचा PCB आणि PCM ग्रुपचा निकाल पाहता येणार आहे.
यंदा MHT CET ची परीक्षा 22 ते 30 एप्रिल पीसीबी ग्रुप साठी तर 2 मे ते 16 मे दरम्यान पीसीएम ग्रुपची परीक्षा झाली. सकाळच्या सत्रात ही परीक्षा 9-12 होते तर दुपारच्या सत्रा 2 ते 5 दरम्यान परीक्षा पार पडली आहे. या परीक्षेमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांचे एकूण 5100 प्रश्न विचारण्यात आले होते. Provisional Answer Key 21 मे दिवशी जारी करण्यात आली असून 25 मे पर्यंत त्यावरील आक्षेप स्वीकारण्यात आले आहेत. नक्की वाचा: पदवीच्या प्रवेशप्रक्रियेत CET च्या गुणांसोबत 12वीचे गुण देखील महत्त्वाचे; पहा सरकारचा नवा नियम .
कसा पहाल MHT CET Exam 2024 निकाल?
- अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
- होमपेजवर ‘Login’ वर क्लिक करून तुमचे तपशील टाका आणि पुढे जा.
- जेव्हा निकाल जाहीर केला जाईल तेव्हा MHT CET result 2024 ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्या निकालाची प्रत सेव्ह आणि डाऊनलोड करण्याची सोय आहे.
परीक्षेतील एकूण 5100 प्रश्नांपैकी केवळ 54 unique question ID वर नोंदवलेले आक्षेप वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या परीक्षेच्या निकालावर इंजिनियरिंग, फार्मसी सारख्या कोर्सचे प्रवेश अवलंबून असतात.