Maharashtra TET 2024 Admit Cards Out: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा साठी प्रवेश पत्र mahatet.in वर जारी; 10 नोव्हेंबरला परीक्षा

परीक्षा एकूण 150 गुणांची असेल. पेपरमध्ये फक्त बहुपर्यायी प्रश्न असतात.

Examinations | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Maharashtra State Council of Examination कडून Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) 2024 साठी अ‍ॅडमीट कार्ड जारी केलं आहे. उमेदवारांना आपलं Maha TET 2024 admit card अधिकृत वेबसाईट mahatet.in वर डाऊनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्रावर उमेदवाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग,  रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक, परीक्षेचे नाव, परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षेचा कालावधी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता असेल. आणि परीक्षा संबंधित मार्गदर्शक तत्त्वे यांचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा एकूण 150 गुणांची असेल. पेपरमध्ये फक्त बहुपर्यायी प्रश्न असतात. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मधील प्रत्येक पेपरचा कालावधी 2 तास 30 मिनिटे आहे. उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण मिळतील आणि चुकीच्या उत्तरांसाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम  नाही.

कसं डाऊनलोड  कराल MAHA TET 2024 Admit Card?

Maharastra TET 2024 exam यंदा 10 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. पेपर 1 हा पहिल्या शिफ्ट मध्ये 10:30 am to 1:00 pm आणि पेपर 2 हा 2:30 pm to 4:30 pm या वेळेत होणार आहे. परीक्षार्थ्यांना त्यांच्या अ‍ॅडमीट कार्ड सोबत पात्र फोटो आयडी सोबत ठेवणं आवश्यक आहे. ही परीक्षा मराठी, इंग्लिश, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलगू, सिंधी,कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये होणार आहे.

Maharashtra TET मध्ये पेपर 1 हा पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तर पेपर 2 हा सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे.