Maharashtra SSC & HSC Repeater Exams Result 2020: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड फेरपरीक्षा निकाल mahresult.nic.in वर आज होणार जाहीर, कसे मिळवाल गुणपत्रक?

याच परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे.

Exam Result | (File Image)

राज्यातील इयत्ता दहावी, बारावी फेरपरीक्षेचा निकाल (Maharashtra SSC & HSC Repeater Exams Result 2020) आज जाहीर होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेतली जाते. ही परीक्षा घेणारी औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशी एकूण नऊ विभागीय मंडळे आहेत. या सर्व मंडळांच्या दहावी, बारावी, फेरपरीक्षांचा निकाल आज म्हणजे बुधवारी (23 डिसेंबर 2020) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल सर्व विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक आणि इतर सर्वांना राज्य शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahresult.nic.in वर पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी या निकालाची प्रिंट काढू शकतात. सर्व विषयांची गुणपत्रक मिळविण्यासाठी काय करावे लागेल? घ्या जाणून.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांतर्फे ( पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण ) इयत्ता दहावी, बारावीची फेरपरीक्षा अनुक्रमे 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 व 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात आली होती. याच परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. (हेही वाचा, FYJC Admissions 2020 Special Round Schedule: 11 वी प्रवेश प्रकियेसाठी आजपासून विशेष फेरीचं आयोजन; इथे पहा वेळापत्रक)

कुठे मिळेल गुणपत्रक?

 

दरम्यान, निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही अडचण, समस्या, आक्षेप असतील, गुणपडताळणी करायची असेल तर संबंधित विद्यार्थ्याने निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी (24 डिसेंबर) लगेचच संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा आहे. हा संपर्क साधण्यासाठी 10 वीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. ज्यांना संकेतस्थळाचा वापर करणे शक्य नाही अशांना स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दरम्यान, पडताळणी करण्याबाबतचे नियम, अटी, शर्ती, सूचना यांबाबत संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रामणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इयत्ता 10 वीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.