Maharashtra Schools to Reopen: 17 ऑगस्ट 2021 पासून सुरु होणार राज्यातील शाळा; मुलांना स्कूल्समध्ये पाठवण्याआधी जाणून घ्या मार्गदर्शक सुचना

त्यानंतर शासनाने देशातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पुढे कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र त्याचेवेळी देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने 15 एप्रिल 2021 पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

देशात मागच्यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर शासनाने देशातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पुढे कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र त्याचेवेळी देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने 15 एप्रिल 2021 पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे व त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. यासोबतच आता राज्यातील शाळादेखील सुरु केल्या जाणार आहेत. मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

म्हणूनच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता 8 ते 12 वी चे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरू करण्याबाबत सरकार विचाराधीन होते. त्यानुसार आता 17 ऑगस्ट, 2021 पासून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच, 2 ऑगस्ट 2021 च्या ‘ब्रेक द चेन’ मधील सुधारित मार्गदर्शक सचूनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय़ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

शाळा सुरु करण्यासाठी सरकारने पुढील मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत-

तर अशाप्रकारे ज्या महापालिकेत शाळा सुरू करणे शक्य आहे, तिथे मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होतील. शहरी भागात करोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना असतील, तर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील.