Maharashtra Rains Update: पावसाचा फटकाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या
विद्यार्थ्यांनी काळजी करुन नये असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
Rains Update Pune: पुणे जिल्ह्यात संततधार कोसळणारा पाऊस आणि अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) पूर्वनियोजीत परीक्षा पुढे ढकलण्यात (Exam Postpone) आल्या आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या सुधारीत परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात काल दिवसभर, संध्याकाळी आणि रात्रभर दमदार पावसाने हजेरी लावली. आज सकाळीही पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी विद्यापीठाने आजच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. आगोदरच कोरोना व्हायरस संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे परीक्षांना विलंब झाला आहे. विलंबाने का होईना परीक्षा पर पडत होत्या. तोपर्यंत मुसधार पावसाने मध्येच दमदार एण्ट्री घेतली आणि परीक्षांना खो घातला. पुढे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत आहे. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी अद्यापही पूरस्थीती कायम आहे. विविध भागांमध्ये विद्यूत पूरवठा खंडीत झाला आहे. हळूहळू हा विद्यूत पूरवठा सुरळीत होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावायचे म्हणजे त्यांना मनस्ताप देण्याचा प्रकार ठरेल. त्यामुळे विद्यापीठाने आजच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, Maharashtra Rains Update: मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासाठी रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा)
दरम्यान, आजच्या परीक्षांबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांनी काळजी करुन नये असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाची बॅटींग सुरु आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे शहरांतील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शरह आणि ग्रामीण भागातील विद्यूतपुरवठाही बराच काळ खंडीत झाला आहे. गेले काही दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.