Maharashtra FYJC Final Merit List 2025: आज जाहीर होणार 11 वी प्रवेशासाठी अंतिम मेरीट लिस्ट; mahafyjcadmissions.in वर कशी पहाल
महाराष्ट्र शिक्षण विभाग 2009-10 पासून मुंबई एमएमआरमध्ये एफवायजेसी आणि इयत्ता 11वीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे,
The Maharashtra School Education and Sports Department कडून आज First-Year Junior College (FYJC) 2025 General Final Merit जारी केली जाणार आहे. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ही यादी अधिकृत वेबसाईट mahafyjcadmissions.in वर पाहता येणार आहे. सध्या या Centralised Admission Process मध्ये राज्यातील 9,281 ज्युनियर कॉलेजचा समावेश आहे. यामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स मिळून एकूण 20.43 लाख जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे.
Maharashtra 2025 Final Merit List कशी पहाल?
- अधिकृत वेबसाईट mahafyjcadmissions.in वर क्लिक करा.
- होमपेजवर तुमचा zone/region निवडा त्यानंतर ‘Maharashtra FYJC Admission 2025 General Merit List’ दिसेल त्या लिंक वर क्लिक करा.
- आता तुमचे लॉगिन साठी आवश्यक credentials टाका.
- आता तुमच्या स्क्रिनवर मेरीट लिस्ट दिसेल.
अधिकृत वेळापत्रकानुसार, Zero Round Quota अंतर्गत व्यवस्थापन, इन हाऊस आणि अल्पसंख्याक श्रेणींमध्ये प्रवेश 12 जून ते 14 जून दरम्यान महाविद्यालयीन स्तरावर घेतले जातील. CAP राऊंड 1 च्या गुणवत्ता यादीची तयारी 17 जूनपासून सुरू होईल आणि त्यानंतर 26 जून रोजी जागा वाटपाचे निकाल जाहीर होतील. CAP फेरी १ मध्ये वाटप केलेल्या जागा विद्यार्थ्यांनी २७ जून ते 3 जुलै दरम्यान कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्यासाठी त्यांच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हजर राहावे. ज्यांना त्यांचे सध्याचे वाटप स्वीकारायचे नाही ते पुढील फेरीत सहभागी होऊ शकतात. CAP फेरी 2 साठी रिक्त जागांची यादी 5 जुलै रोजी प्रकाशित केली जाईल.
महाराष्ट्र शिक्षण विभाग 2009-10 पासून मुंबई एमएमआरमध्ये एफवायजेसी आणि इयत्ता 11वीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे, जी नंतर पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद (2022 मध्ये बंद) आणि 2023-24 मध्ये अमरावतीपर्यंत वाढविण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)