Maharashtra CET 2021 Registration Reopens: यंदा सीईटी देणार्‍यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक पुन्हा उपलब्ध; 16 ऑगस्ट पर्यंत mahacet.org वर असं करा रजिस्टर

MHT CET, MAH MBA, MAH MCA, MAH-M.ARCH, MAH-M.HMCT आणि MAH-BHMCT देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

महाराष्ट्र सीईटी सेल (State Common Entrance Test Cell, Maharashtra) कडून आज (12 ऑगस्ट) पासून Maharashtra CET 2021 च्या रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि प्रोफेशनल कोर्स साठी यंदा शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी याद्वारा रजिस्ट्रेशन करता येणार आहे. राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर परिस्थिती मुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पासून वंचित राहिले होते. पावसामुळे ग्रामीण भागात वीज, इंटरनेट ठप्प होते त्यामुळे सीईटी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळावी ही मागणी जोर धरत होती आणि आता तंत्र आणि उच्च शिक्षण विभागाकडून ही मागणी पूर्ण झाली आहे. इच्छूक विद्यार्थी MAHACET चे अधिकृत संकेतस्थळ mahacet.org ला यासाठी भेट देऊ शकतात.

आजपासून पुन्हा सुरू करण्यात आलेले रजिस्ट्रेशन 16 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्यांना आता अ‍ॅप्लिकेशन फॉर्म मध्ये काही बदल करायचे असल्यास त्याची देखील सोय आहे. 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान बदल स्वीकारले जाणार आहेत. बदलांमध्ये नाव, फोटो, स्वाक्षरी, परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा असेल. नक्की वाचा: Mumbai University UG Course: युजीच्या प्रवेशासाठी 17 ऑगस्टला मुंबई विद्यापीठ करणार पहिली यादी जाहीर, जाणून घ्या कशी पाहता येणार?

Maharashtra CET 2021 साठी ऑनलाईन अप्लाय कसं कराल?

इथे पहा रजिस्ट्रेशन साठी डायरेक्ट लिंक!

MHT CET, MAH MBA, MAH MCA, MAH-M.ARCH, MAH-M.HMCT आणि MAH-BHMCT देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. यंदा राज्यात 26 ऑगस्ट पासून सीईटी परीक्षा सुरू होत आहेत.