Maharashtra Board SSC HSC Exam 2023: यंदा 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर न पोहचल्यास मुकावं लागू शकेल पेपर ला; नियमांत बदल
यंदा 12वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च पर्यंत होणार आहे तर 10वी ची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.
कोविड 19 च्या संकटानंतर यंदा प्रथमच कोणत्याही निर्बंधांशिवाय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ 10वी, 12वी ची परीक्षा घेणार आहे. मागील दोन वर्ष विद्यार्थ्यांना अनेक मुभा होत्या त्या सार्या मागे घेण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर पोहचण्याच्या वेळेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना अपवादात्मक स्थितीत जर पेपरला पोहचण्यासाठी 10 मिनिटांचा उशिर झाला तरीही परीक्षेला बसण्याची मुभा होती पण आता परीक्षेच्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रांवर न पोहचल्यास विद्यार्थ्यांना पेपरला बसता येणार नाही.
यंदा 12वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च पर्यंत होणार आहे तर 10वी ची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षेदरम्यान काही पेपर हे सकाळच्या सत्रात 11 वाजता तर काही पेपर दुपारी 3 वाजता होणार आहे. या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच पोहचावे लागणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना 10.30 आणि 2.30 अशा वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर राहणं गरजेचे आहे.
अनेकदा विद्यार्थ्यांना उशिरा पोहचल्यास पेपरला बसण्याची मुभा दिल्याने काही पेपर फूटीच्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना फायदा मिळत होता. तर काही जण या मुभेचा गैरफायदा घेत होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना उशिरा पोहचता येणार नाही यासाठी बोर्डानेच नियम कडक करत काही शाळा, कॉलेजला त्याबाबतचे पत्रक पाठवले आहे. SSC-HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता बोर्डाच्या परीक्षेत होम सेंटर बंद, शिक्षण विभागाकडून विशेष नियामावली जारी .
12वीच्या विद्यार्थ्यांना 27 जानेवारी पासून हॉलतिकीट उपलब्ध करण्यात आली आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ती शाळेकडून मुख्यध्यापकांच्या सही, शिक्क्याने मिळतील. यंदा परीक्षा केंद्र देखील विद्यार्थ्यांना स्वतःचीच शाळा नसणार आहे. कोविड च्या काळात विद्यार्थी स्वतःच्याच शाळेत परीक्षा देत होते. तसेच परीक्षा देण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना यंदा वाढीव वेळ मिळणार नाही.