Maharashtra Board 10th Result 2022: 10वी चा निकाल उद्या mahresult.nic.in सह ऑनलाईन कसा, कुठे पाहू शकाल?

12वी प्रमाणे राज्य शिक्षण मंडळ 10वीचा निकाल ऑनलाईन माध्यामातून दुपारी 1 वाजता जाहीर करतील.

Results (Archived, edited, representative images)

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 17 जून दिवशी यंदा 10वीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) जाहीर केला जाणार आहे. आठवडाभरापूर्वी 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक यांचे लक्ष लागले आहे. कोरोना संकटाच्या 2 वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच 10वीच्या परीक्षा ऑफलाईन व्यवस्थित पार पडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि अन्य अनेक अडथळे पार करून बोर्डाची परीक्षा यंदा देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

12वी प्रमाणे राज्य शिक्षण मंडळ 10वीचा निकाल ऑनलाईन माध्यामातून दुपारी 1 वाजता जाहीर करतील. यंदा दहावीच्या परीक्षेला १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. मागील वर्षी बोर्डाची परीक्षा न घेतला अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने दहावीचा निकाल लावण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या निकालामध्ये काय होणार याची धाकधूक वाढलेली आहे.

कुठल्या वेबसाईट्सवर निकाल पहाल?

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10वीचे विद्यार्थी mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट्सवर विषयनिहाय निकाल पाहू शकणार आहेत. 

10 वीचा निकाल ऑनलाईन कुसा पहाल?

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.