mahresult.nic आणि ssc.mahresults.org.in वर जाहीर झाला Maharashtra Board 10th Result 2022; असा करा चेक

कोकण विभागात सर्वाधिक तर नाशिक विभागात सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

SSC Result 2022 | File Image

MSBSHSE 10th Results 2022 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज अखेर 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल 96.94% लागला आहे. कोकण विभागात (Konkan Division) सर्वाधिक तर नाशिक विभागात (Nashik Division) सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा 10वीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. 11वाजता पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना असलेल्या त्यांच्या वैयक्तिक निकालाची उत्सुकता संपली आहे. विद्यार्थी पालक त्यांचे 10वीचे गुण आणि निकाल  http://mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.in  या अधिकृत वेबसाईट सह अन्य काही थर्ड पार्टी वेबसाईट्स वर पाहू शकणार आहेत. यासाठी तुम्हांला आईचं नाव आणि रोल नंबर आवश्यक आहे.   

कसा पहाल 10वीचा निकाल?

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नक्की वाचा:  What To Do After 10th: 10 वी नंतर काय करावे? कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा? जाणून घ्या.

यंदा दहावीच्या परीक्षेला १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. मागील वर्षी बोर्डाची परीक्षा न घेतला अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने दहावीचा निकाल लावण्यात आला होता.