Maharashtra Board 10th, 12th Supplementary Exam Result 2023: दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल 28 ऑगस्टला; maharesult.nic.in वर पहा गुण
maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Higher Secondary School Certificate Examination) घेण्यात आलेल्या यंदाच्या 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (SSC, HSC Supplementary Exam Result) 28 ऑगस्ट, सोमवार दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी त्याबाबतचे परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. बोर्डाने यंदा दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान घेतली आहे तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट घेतली आहे. या परीक्षेच्या वेळेस अतिवृष्टीमुळे तीन वेळा बदलही करण्यात आले होते. त्यामुळे या परीक्षांच्या निकालाकडे पालक, विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष होते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे त्यामुळे अनेकांचे या निकालाकडे लक्ष होते.
कसा आणि कुठे पहाल 10वी,12वी पुरवणी परीक्षेचा निकाल?
- maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- निकालाची लिंक पहा आणि क्लिक करा.
- विचारलेली आवश्यक माहिती भरा.
- तुमचा निकाल स्क्रिन वर दिसेल.
दरम्यान पुरवणी परीक्षेच्या निकालातही गुणपडताळणी आणि फोटो कॉपी घेता येते. सोमवारी निकाल लागल्यानंतर 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये त्यासाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. हा अर्ज ऑनलाईन करता येतो. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यानंतर उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे पाठवावा लागेल.