JNU निवडणूकीत पुन्हा एकदा 'लाल सलाम'; महाराष्ट्राच्या साकेत मून याची दमदार कामगिरी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पराभूत

त्यामुळे डाव्या आघाडीतर्फे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या ओइशी घोष हिची अध्यक्षपदी तर, साकेत मून याची उपाध्यक्षपदी निवड झाली.

Aishe Ghosh and Saket Moon

देशाच्या शैक्षणिक आणि राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या तसेच, डाव्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जवाहरलाल नेहरु विद्यापीठ' (Jawaharlal Nehru University) विद्यार्थी संघटना निवडणुकीत पुन्हा एकदा 'लाल सलाम' घुमला आहे. जेएनयू (JNU) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध एआयएसए, एसएफआय, एआयएसएफ, डीएसएफ ही डावी संयुक्त आघाडी अशा झालेल्या थेट लढतीत डाव्या आघाडीने जोरदार विजय संपाद केला आहे. डाव्या संयुक्त आघाडीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागांवर बाजी मारत जेएनयूमध्ये पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व दाखवुन दिले आहे. दरम्यान, या लढतीत मूळचा महाराष्ट्राचा असलेल्या साकेत मून या तरुणाने विशेष कामगिरी दाखवली. त्याची जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

दरम्यान, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रचंड लक्षवेधी तितकीच रंजक ठरलेल्या अशा या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत अखेर डावी संयुक्त आघडी विजयी ठरली. त्यामुळे डाव्या आघाडीतर्फे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या ओइशी घोष हिची अध्यक्षपदी तर, साकेत मून याची उपाध्यक्षपदी निवड झाली. आइशी घोषने अभविपच्या मनीष जांगीडचा 2313 मते मिळवत पराभव केला. नागपूर जिल्ह्यातील साकेत मून हा डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन( डीएसएफ) तर्फे रिंगणात होता. त्याने अभविपच्या श्रीती अग्निहोत्री हिचा 3365 मते मिळवत पराभव केला. साकेतला मिळालेल्या मतांचा आकडा हा श्रुतीच्या मतांपेक्षा दुप्पटीने अधिक होता. (हेही वाचा, International Literacy Day 2019: उच्चशिक्षीत निरक्षरांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा!)

ट्विट

एएनआय ट्विट

दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या (एआयएसएफ) सतिश चंद्र यादव 2518 मते मिळवत सचिवपदी निवडला गेला. तर, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (एआयएसएफ) मोहम्मद दानिश 3295 मते मिळवत सहसचिव म्हणून निवडला गेला. दरम्यान, ही निवडणूक प्रचंड अटीतटीची ठरली होती. दोन विद्यार्थ्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनेंतर न्यायालयाने विद्यापीठाला या निवडणुकीचा निकाल रोखून ठेवावा असे सांगितले होते. दरम्यन, उच्च न्यायालयालयाने विद्यापीठाला सहा सप्टेंबर रोजी निर्जेश दिले होते की, निवडणुकीचा निकाल घोषीत करावा. त्यानुसार निकाल घोषीत करण्यात आला. निकालानंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर 'लाल सलाम'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.