All India Radio Job Opportunity: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात नोकरीची संधी, करा आजचं अर्ज

आकाशवाणी मुंबई विविध पदांची पदभरती केल्या जाणार आहे.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

हल्ली मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. तसेच खासगी क्षेत्रात नोकरीसाठी (Private Jobs) मोठी स्पर्धा आहे शिवाय त्या नोकरीची लांब कालवधीची हमी देखील कमी असते. म्हणून सरकारी नोकरी (Government Jobs) मिळालेली सर्वोत्तम. पण सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी हवी असल्यास त्यासाठी विशेष प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात पण आता सरकारी कार्यालयात नोकरीची संधी आहे. ऑल इंडिया रेडिओकडून (Union Public Service Commission) विविध पदांची भरती केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Website Notification) प्रसिद्ध करण्यात आले. तरी यासाठी नोंदणी प्रक्रीया (Registration), शैक्षणिक पात्रता (Educational Qualification), पगार (Payment) किती असेल हे जाणून घेवूया.

 

ऑल इंडिया रेडिओत (All India Radio) नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे प्रसारमाध्यमातील 5 वर्षाच्या कामाचा अनभुव किंवा कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree), मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता क्षेत्रातील पदवी (Journalism Degree) किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (Diploma)असणे आवश्यक आहे. मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट सादर करावा लागेल. तरी उमेदवाराचे वय २१ ते ५० वर्षांदरम्यान असावे.

 

आकाशवाणी मुंबई अंतर्गत वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार (News reporters-and-translators) , वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर (news editors-and-correspondents), प्रसारण सहाय्यक (Broadcast Assistant),आणि वेब सहाय्यक (Web Assistant)ही पदे भरली जातील. तर नोकर भरती करण्यात येत असलेल्या या जागा हंगामी स्वरुपाच्या असणार आहेत.