JEE, NEET Exams 2020 घेण्याबाबत HRD Ministry ने बनवली खास समिती; उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
Pokhriyal) यांनी दिलेल्या माहितीनुसार आता National Testing Agency आणि अन्य तज्ञांची एक विशेष समिती बनवली आहे. त्यांच्याकडून देशातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
भारतामध्ये वाढणारा कोरोना व्हायरसचा धोका पाहता आता देशात जुलै महिन्यात होणार्या IIT JEE आणि NEET Exams 2020 वर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक पालकांनी देखील आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या विरोधी याचिका दाखल केली आहे. दरम्यान आज (2 जुलै) केंद्रीय मनुष्यबळ आणि संसाधन मंत्री रमेश पोखरियाल (R. Pokhriyal) यांनी दिलेल्या माहितीनुसार आता National Testing Agency आणि अन्य तज्ञांची एक विशेष समिती बनवली आहे. त्यांच्याकडून देशातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अहवाल उद्या (2 जुलै) पर्यंत सादर केला जाणार आहे. त्यावर आता यंदाच्या JEE आणि NEET Exams 2020 चं भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान यंदा जेईई ही इंजिनियरिंगची परीक्षा JEE Main 2020 परीक्षा 19-23 जुलै दरम्यान होणार तर JEE Advanced ऑगस्ट महिन्यात आयोजित आहे. तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी NEET 2020 परीक्षा 26 जुलै दिवशी आयोजित केली आहे. दरम्यान भारतामध्ये यंदा JEE Main साठी 9 लाख तर NEET 2020 साठी 15.93 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला आहे. IIT-Bombay चे डिसेंबर 2020 पर्यंतचे वर्ग ऑनलाईन होणार; COVID 19 च्या पार्श्वभूमीवर निर्णय.
ANI Tweet
भारतामध्ये आज कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाखांच्या पार गेला आहे. मुंबई, दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर 10वी,12 वीच्या सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
देशात सद्य घडीला एकूण कोरोना बाधितांची संख्या 6,04,641 वर पोहोचली असून एकूण 17,834 रुग्ण दगावले आहेत. तसेच काल (1 जुलै) 11,881 नवे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,59,860 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात येत आहे. देशात सद्य घडीला 2,26,947 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.