IPL Auction 2025 Live

JEE Mains 2022 Session 2 Result: जेईई मेन्स परीक्षा सेशन्स 2 चा निकाल जाहीर; jeemain.nta.nic.in वर पहा स्कोअरकार्ड

तसेच देशातील रॅन्क जाहीर करण्यात आला आहे. या निकालावर त्यांची JEE Advanced 2022 ची पात्रता ठरते.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

JEE Main परीक्षेचा यंदा जुलै सत्रात झालेल्या दुसर्‍या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आले आहेत. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारखेची गरज आहे. BE, B Tech (Paper 1) आणि B Arch, B Planning (Paper 2) परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षा 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आल्या आहेत.

जेईई मेन्स निकालामध्ये एनटीए कडून विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल गुण दाखवण्यात आले आहेत. तसेच देशातील रॅन्क जाहीर करण्यात आला आहे. या निकालावर त्यांची JEE Advanced 2022 ची पात्रता ठरते.

कसा पहाल निकाल?

IITs मध्ये प्रवेशासाठी यंदा JEE Advanced या पुढील टप्प्यातील परीक्षेला 2.5 लाख विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. JEE Advanced ची अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली असून 28 ऑगस्टला त्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.