JEE Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता; nta.ac.in असं पहा स्कोअरकार्ड

त्याचा तपास सीबीआय कडून करण्यात येत आहे. त्यामुळे देखील जेईई मेन च्या चौथ्या सत्राचा निकाल लागण्यास उशिर झाल्याचं म्हटलं जात आहे.

निकाल। File image

नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) कडून JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आयत्या वेळेस परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करत ही परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान पार पदली. त्यानंतर आता आज (13 सप्टेंबर) दिवशी या सत्राचा निकाल लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअरकार्ड्स, रॅन्क लिस्ट NTA ची अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in किंवा nta.ac.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. (नक्की वाचा: JEE Advanced Registration 2021: जेईई एंडवांस 2021 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज, जाणून संपूर्ण वेळापत्रक).

काही दिवसांपूर्वी यंदाच्या जेईई परीक्षेमध्ये स्कॅम झाल्याची देखील बाब समोर आली आहे. त्याचा तपास सीबीआय कडून करण्यात येत आहे. त्यामुळे देखील जेईई मेन च्या चौथ्या सत्राचा निकाल लागण्यास उशिर झाल्याचं म्हटलं जात आहे. अनेकांनी चौथ्या सत्राच्या परीक्षांचं रिव्हॅल्युएशन करण्याची मागणी केली आहे. प्रामुख्याने ज्यांच्या निकालामध्ये मोठा फरक बघायला मिळाला आहे.

जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल कसा पहाल?

जेईई मेन नंतर आयआयटी मध्ये प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्सचे वेध लागतात. याकरिता टॉप 2.5 लाख रॅन्कर्सनाच संधी मिळते. जेईई मेन च्या मार्क्सवरून अनेकांना इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळतात. निकाल जाहीर झाल्यानंतर JOSAA अर्थात Joint Seat Allocation Authority कडून काऊन्सलिंग प्रोसेस सुरू करणार आहे.