JEE Main Result 2020 Date: यंदा NTA कधीपर्यंत जाहीर करू शकते Merit List? जाणून घ्या जेईई मुख्य परीक्षा निकाला बद्दल
मीडीया रिपोर्टनुसार, 11 सप्टेंबरला जेईई मुख्य परीक्षा 2020 चा निकाल लागू शकतो. दरम्यान अधिकृत घोषणा झाल्यानंतर अंतिम निकाल आणि मेरीट लिस्ट NTA च्या ऑफिशिएअल वेबसाईट jeemain.nta.ac.in वर जाहीर केली जाऊ शकते.
भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटाखाली NTA कडून जेईई मेन्स परीक्षा 2020 (IIT JEE Mains 2020) पार पडल्या. आता या परीक्षांच्या Answer Key प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान अजून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मीडीया रिपोर्टनुसार, 11 सप्टेंबरला जेईई मुख्य परीक्षा 2020 चा निकाल लागू शकतो. दरम्यान अधिकृत घोषणा झाल्यानंतर अंतिम निकाल आणि मेरीट लिस्ट NTA च्या ऑफिशिएअल वेबसाईट jeemain.nta.ac.in वर जाहीर केली जाऊ शकते.
दरम्यान यंदा जेईई मुख्य परीक्षा 2020 साठी सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. काही दिवसांपूर्वी jeemain.nta.nic.in वर उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. 10 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना बदल सुचवण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर NTA त्यामध्ये बदल करून अंतिम निकाल जाहीर करेल. JEE Advanced 2020 Date: IIT Delhi कडून Entrance Exam चं सुधारित वेळापत्रक जारी; jeeadv.ac.in वर 11 सप्टेंबर पासून रजिस्ट्रेशन सुरू.
अद्याप जेईई मुख्य परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृत घोषणेची वाट पहावी लागणार आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना All India Rank (AIR), category rank, JEE Main qualifying cutoff आणि NTA percentile score दाखवले जातात. त्यामुळे यावरून विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश ठरतात. भारतामध्ये NTA कडून दोनदा प्रवेश परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये चांगले मार्क्स ते ग्राह्य धरून विद्यार्थ्याचा विचार केला जातो.
जसा जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो तशीच त्याची क्वालिफाईंग कट ऑफदेखील प्रसिद्ध केली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिफाईड JEE Main 2020 विद्यार्थ्यांनाच केवळ मुख्य परीक्षेनंतर JEE Advanced देता येते. यंदा देशात JEE Advanced 2020 ची परीक्षा 27 सप्टेंबर पासून घेतली जाणार आहे. फिजिक्स, केमेस्ट्री आणि गणित विषयाच्या 2 प्रश्नपत्रिका जेईई अॅडव्हान्सच्या विद्यार्थ्यांना दिले जातात. कम्प्युटर बेस्ड परीक्षेमध्ये 3 तासाच्या कालावधीमध्ये ही प्रश्नपत्रिका पूर्ण करायची असते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)