JEE (Main) Examination 2021 Update: जेईई मेन परीक्षेच्या तिसर्‍या व चौथ्या टप्प्यातील तारखांची घोषणा, पहा डिटेल्स

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांनी जेईई परीक्षेच्या (JEE Main Examination 2021) तिसर्‍या व चौथ्या टप्प्यातील तारखांची घोषणा केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांनी जेईई परीक्षेच्या (JEE Main Examination 2021) तिसर्‍या व चौथ्या टप्प्यातील तारखांची घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, तिसर्‍या टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात 20 ते 25 या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, चौथ्या टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येईल. जेईई मेन 2021 च्या परीक्षेच्या तारखांचा तपशील एनटीएकडून लवकरच कळविला जाण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यंदा जेईई मेन चार टप्प्यात घेण्याची घोषणा केली होती.

ज्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसरा आणि चौथा टप्पा एप्रिल आणि मेमध्ये होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. कोरोनामुळे JEE Advanced प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा 3 जुलै रोजी होणार होती. जेईई मेन सोबत नीट (NEET) इच्छुकही परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत, मात्र अद्याप यावर कोणतेही अपडेट नाही.

रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता आम्ही मागील वेळेच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढविली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले, देशाच्या इतिहासात जिथे जेईई परीक्षा एकदा घेण्यात येत असे, आता ते चार-चारवेळा घेण्यात आली आहे. निशंक पुढे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे केंद्र बदलायचे आहे ते 6 ते 8 जुलै दरम्यान लॉग इन करून केंद्र बदलू शकतात. विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेता त्यांना परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 23 जुलै नंतर; अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जारी)

जे विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत त्यांनाही अर्ज करण्याची संधीही दिली जात आहे. असे लोक 6 जुलै रात्रीपासून ते 8 जुलै 2021 रात्री 11.50 पर्यंत अर्ज करू शकतात. चौथ्या टप्प्यात अर्ज करण्याची तारीख 9 जुलै ते 11 जुलै पर्यंत आहे.