JEE Main Result 2021: जेईई मेन परीक्षा रिजल्ट जाहीर; जाणून घ्या कुठे, कसा पाहाल?

फेब्रुवारी 2021 च्या मुख्य सत्राचा हा निकाल आपण अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता. त्यासाठी अधिक माहिती जाणून घ्या.

Result | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारा घेतल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2021 चा निकाल (Joint Entrance Examination (JEE) Main 2021) जाहीर झाला आहे. याहूनही सोप्या भाषेत सांगायचे तर जेईई मेन परीक्षा रिजल्ट (जेईई मुख्य परिक्षेचा निकाल (JEE Main Result 2021) जाहीर झाला आहे. फेब्रुवारी 2021 च्या मुख्य सत्राचा हा निकाल आपण अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता. त्यासाठी अधिक माहिती जाणून घ्या. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, ऑनलाईन, ऑफलाईन अशा विविध घडामोडींतून गेल्यामुळे या निकालाबाबत विद्यार्थी, पालक आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळात मोठी उत्सुकता होती.

कसा पाहाल निकाल?

एनटीएने जेईई मेन 2021 परीक्षेसाठी नवा पॅटर्न तयार केला होता. परीक्षार्थींना 90 प्रश्नांपैकी केवळ 75 प्रश्नांचे उत्र द्यायचे होते. यात 15 प्रश्न हे वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणारे होते. तसेच त्यासाठी नगारात्मक मूल्यांकनही नव्हते.