JEE Main 2022 Result : जेईईमध्ये देशातील 14 विद्यार्थांना 100% तर राज्यातून नागपूरचा अद्वय क्रिष्णा प्रथम
नागपूरचा (Nagpur) अद्वय क्रिष्णा (Adwai Krishna) जेईई मुख्य परीक्षा- 2022 सत्र एकचा जाहीर केलेल्या निकालात राज्यातून प्रथम आला आहे. त्याला 99.998449% मिळाले आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने काल जेईई मेन परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार, JEE Mains 2022 मध्ये एकूण 14 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यात झारखंडचा (Jharkhand) कुशाग्र श्रीवास्तव (Kushagra Srivastava), हरियाणातील (Haryana) सार्थक माहेश्वरी (Sarthak Maheshwari), तेलंगणातील (Telangana) अनिकेत चट्टोपाध्याय (Aniket Chatopadhyay) आणि धीरज, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कोयन्ना सुहास (Koyna Suhas), पंजाबमधील (Panjab) मृणाल गर्ग (Mrunal Garg), आसाममधील (Assam) स्नेहा पारीक (Sneha Parik) या विद्यार्थांचा समावेश आहे.
नागपूरचा (Nagpur) अद्वय क्रिष्णा (Adwai Krishna) जेईई मुख्य परीक्षा- 2022 सत्र एकचा जाहीर केलेल्या निकालात राज्यातून प्रथम आला आहे. त्याला 99.998449% मिळाले आहेत. अद्वय जैन इंटरनॅशनल शाळेचा (Jain International school) विद्यार्थी असून सध्या सीबीएसई (CBSE) बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. अद्वयने बारावीची परीक्षा 2021-2022 या सत्रात दिली आहे. अद्वयचा भविष्यात आयआयटीला (IIT) प्रवेश घेण्याचा निर्धार केला आहे. तर जेईई मुख्य परीक्षा सत्र 2 ही 21 ते 30 जुलै या दरम्यान होईल. सत्र 2 ची परीक्षा झाल्यानंतर काऊन्सेलिंगसाठी ऑल इंडिया रँक (All India Rank) आणि कट ऑफ (Cut Off) जाहीर करण्यात येतील. साधारणपणे एप्रिल (April) महिन्यामध्ये जेईई मेन परीक्षा घेण्यात येतात. पण यंदा जेईई मेन परीक्षेच्या (JEE Main Result 2022) तारखांमध्ये काही बदल करण्यात आला होता. परीक्षेची तारीख आधी मे महिना आणि त्यानंतर जून महिन्यात पुढे ढकलण्यात आली होती. तर जेईई मेन पहिल्या सत्राची परीक्षा 20 जून 2022 ते 29 जून 2022 या कालावधीत घेण्यात आली असुन या परिक्षेचा निकाल काल म्हणजे 11 जुलै रोजी जाहिर करण्यात आला आहे. (हे ही वाचा:-UGC NET Admit Card 2022: युजीसी नेट परीक्षेचं अॅडमीट कार्ड जारी; ugcnet.nta.nic.in वरून करा डाऊनलोड!)
यंदा 7 लाख विद्यार्थ्यांनी JEE Mains Session 1 Exams दिली होती. या परिक्षेत उत्तीर्ण होणार्यांना JEE Advanced 2022 Exam साठी पात्र केले जाते. अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना जन्मतारीख, अॅप्लिकेशन नंबर टाकून लॉग इन करावं लागणार आहे. JEE Main 2022 Session 2 ही परीक्षा 21 जुलै ते 30 जुलै 2022 दरम्यान घेतली जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)