JEE Main 2022 Paper 2 चा निकाल जाहीर, ‘या’ लिंकवर तपासा तुमचा रिजल्ट

जेईई मेन पेपर 2 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Representative Image ( Photo Credits: Pixabay )

जेईई मेन 2022 च्या पेपर 2 (JEE Main 2022 Paper 2) दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सुचना आहे. जेईई मेन पेपर 2 चा निकाल (JEE Main 2022 Paper 2 Result) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तरी विद्यार्थी त्यांचा निकाल (Result) लगेच घरबसल्या बघू शकतात. जेईई मेन पेपर 2 चा निकाल विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर (Website) बघता येईल. तसेच डाऊनलोड (Download) हे ऑप्शन (Option) सक्रीय असल्याने विद्यार्थ्यांना (Students) त्यांचा निकाल सहज डाऊनलोड देखील करता येईल. jeemain.nta.nic.in या लिंकवर (Link) गेल्यानंतर तिथे JEE मेन पेपर 2 च्या निकालाची लिंक (Result Link) सक्रिय करण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लीक (click) करताच तुमचा निकाल थेट तुमच्या स्क्रीनवर (Screen) तुम्हाला बघायला मिळेल.

 

जेईई मेन रँक कार्ड डाउनलोड (JEE Main Rank Card Download) करण्यासाठीच्या स्टेप्स (steps) आणि थेट लिंक (Link) खाली दिली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट (website) jeemain.nta.nic.in वर निकाल (Result) पाहू शकतात. JEE मेन परिक्षेचा निकाल 7 ऑगस्ट (August) रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई मेन पेपर 2 (JEE Main Paper 2) देण्याची संधी मिळाली. तरी ही परिक्षा 25 जुलै (July) 2022 ते 30 जुलै 2022 या कालावधीत पार पडली आणि आज म्हणजे 2 सप्टेंबर (September) रोजी या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी जोसा काऊंसलिंग 2022 (JOSAA Counselling 2022) साठी पात्र ठरतील. तरी संबंधित अधिक माहितीकरीता विद्यार्थ्यांनी (students) जेईईची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी. (हे ही वाचा:-)

 

विद्यार्थ्यांनी (Students) निकाल बघण्यासाठी जेईई मेन्सची (JEE Mains) अधिकृत वेबसाईट (Website) jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी. तिकडे गेल्यावर जेईईचं होमपेज (JEE Homepage) उघडेल. होम पेजवर JEE मेन 2022 पेपर 2 स्कोअर कार्ड (Score Card) या ऑप्शनवर (Option) क्लिक (Click) करा. तिकडे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मागण्यात येईल. नोंदणी क्रमांक भरल्यास परिक्षेसंबंधी इतरही आवश्यक दस्तावेज मागण्यात येईल. ती सगळी माहिती सबमिट (Submit) करा. सगळी माहिती भरल्यास तुमच्या स्क्रीनवर (Screen) तुमचा निकाल (Result) उपलब्ध होईल. या निकालाची डिजीटल कॉपी (Digital Copy Download) तुम्ही डाऊनलोड करु शकता किंवा त्यांची प्रिंटही (Print) काढू शकता.