JEE Advanced 2024 Result Declared: जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल जाहीर; वेद लाहोटीने ठरला देशातील टॉपर

निकालामध्ये उमेदवाराने मिळवलेले गुण, कॉमन रँक लिस्ट (CRL) आणि कॅटेगरी रँक लिस्ट समाविष्ट आहे. जेईई एडवांस्ड परीक्षेत वेद लाहोटी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

Representative Image (Photo Credit- PTI)

JEE Advanced 2024 Result Declared: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने आज 9 जून रोजी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) ॲडव्हान्स 2024 चा निकाल जाहीर केला आहे. जेईई ॲडव्हान्स 2024 परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचे स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात. निकालामध्ये उमेदवाराने मिळवलेले गुण, कॉमन रँक लिस्ट (CRL) आणि कॅटेगरी रँक लिस्ट समाविष्ट आहे. जेईई एडवांस्ड परीक्षेत वेद लाहोटी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

IIT बॉम्बे झोनची द्विजा धर्मेशकुमार पटेल JEE Advanced Result 2024 मध्ये टॉप रँक असलेली महिला उमेदवार बनली आहे. तिला जेईई ॲडव्हान्स्डमध्ये 332/360 गुण मिळाले आहेत. पेपर 1 आणि 2 साठी उपस्थित झालेल्या 180,200 उमेदवारांपैकी 7,964 महिला उमेदवारांसह एकूण 48,248 उत्तीर्ण झाले.

JEE Advanced Result 2024 टॉपर्स -

JEE Advanced Result 2024 चा निकाल कसा तपासावा -

IIT प्रवेश परीक्षा 26 मे 2024 रोजी देशभरातील अनेक केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर 2 जून ला अॅन्सर की प्रसिद्ध झाली. जेईई मेन 2024 च्या केवळ टॉप 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्डला बसण्याची संधी मिळते. यावर्षी जेईई ॲडव्हान्स्डचे कट ऑफ मार्क्स वाढले होते. जेईई मेन 2024 मध्ये सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान कट ऑफ 93.2 टक्के होता.