JEE Advanced Result 2022 Declared: जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल jeeadv.ac.in वर जाहीर; इथे पहा स्कोअरकार्ड
Indian Institute of Technology, IIT Bombay कडून आज (11 सप्टेंबर) JEE Advanced 2022 Result जाहीर करण्यात आला आहे.
Indian Institute of Technology, IIT Bombay कडून आज (11 सप्टेंबर) JEE Advanced 2022 Result जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. आजच्या निकालासोबत आयआयटी बॉम्बे कडून फायनल आन्सर की देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. IIT JEE 2022 ची परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी Indian Institutes of Technology च्या सर्व 23 शाखांमध्ये उपलब्ध अभियांत्रिकी, तंत्रज्ञान किंवा आर्किटेक्चर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. हे देखील नक्की वाचा: JEE-Advanced 2022 Result: बॉम्बे झोन मधून R K Shishir देशात अव्वल.
JEE Advanced Result 2022 कसा पहाल?
- jeeadv.ac.in 2022 या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर, जन्म तारीख आणि इतर तपशील टाका.
- आता तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. त्यानंतर स्कोअरबोर्ड डाऊनलोड करण्याचाही पर्याय तुमच्याकडे असेल.
या डिरेक्ट लिंक वर पहा जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल.
IIT Bombay कडून जेईई अॅडव्हान्सची परीक्षा यंदा 28 ऑगस्ट 2022 दिवशी घेण्यात आली होती त्यानंतर 3 सप्टेंबरला त्याची आन्सर की प्रसिद्ध झाली होती. आता आयआयटी बॉम्बे कडून Joint Seat Allocation ची प्रक्रिया अंदाजे 12 सप्टेंबर पासून सुरू केली जाऊ शकते.