IPL Auction 2025 Live

JEE Advanced Admit Card 2022 Released; 28 ऑगस्टपूर्वी jeeadv.ac.in वरून असं डाऊनलोड करा हॉल तिकीट

जेईई च्या परीक्षेनंतर 3 सप्टेंबरला प्रोव्हिजनल आन्सर की प्रसिद्ध केली जाईल तर 11 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

JEE Advanced Admit Card 2022 (Credits: JEE Website)

आयआयटी बॉम्बे (Indian Institute of Technology, Bombay) कडून Joint Entrance Examination (JEE) Advanced 2022 admit card जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे अ‍ॅडमीट कार्ड jeeadv.ac.in वर पाहता येणार आहे. आजपासून 28 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेपर्यंत विद्यार्थी त्यांचं हॉलतिकीट डाऊनलोड करू शकणार आहे. दरम्यान हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी लॉगिन करावं लागणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर, जन्म तारीख आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना हे हॉल तिकीट सोबत ठेवणं आवश्यक आहे.

जेईई अ‍ॅडव्हान्स 2022 परीक्षा 28 ऑगस्ट दिवशी होणार आहे. पेपर1 हा सकाळी 9 ते 12 यावेळेत आणि पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे. हे देखील नक्की वाचा: CUET UG 2022 Phase 6 Exam Admit Card जारी; अधिकृत वेबसाईट cuet.samarth.ac.in वरून असं करा डाऊनलोड .

जेईई अ‍ॅडव्हान्स 2022 हॉलतिकीट कसं कराल डाऊनलोड?

जेईई च्या परीक्षेनंतर 3 सप्टेंबरला प्रोव्हिजनल आन्सर की प्रसिद्ध केली जाईल तर 11 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा कम्युटर बेस्ड होणार आहे. त्यामध्ये मल्टिचॉईस प्रश्न असतात. चुकलेल्या उत्तरांसाठी देखील मार्क्स कापले जाणार आहेत.