JEE Advanced 2025 Results Announced: IIT Kanpur कडून जेईई अ‍ॅडव्हान्स चा निकाल वेळेआधीच जाहीर; jeeadv.ac.in पहा स्कोअरकार्ड

आयआयटी कानपूरने 18 मे रोजी दोन शिफ्टमध्ये आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड 2025 परीक्षा घेतली. आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे. अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मार्क्स पाहता येतील.

JEE Advanced 2025 Results Announced:  IIT Kanpur कडून जेईई अ‍ॅडव्हान्स चा निकाल वेळेआधीच  जाहीर; jeeadv.ac.in पहा स्कोअरकार्ड
Result | Pixabay.com

Indian Institute of Technology (IIT) Kanpur कडून आज JEE Advanced 2025 चा निकाल जाहीर केला आहे. आज हा निकाल्ल सकाळी 10 वाजता अपेक्षित होता मात्र त्याआधीच म्हणजे सकाळी सहा वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा results25.jeeadv.ac.in या डिरेक्ट लिंक वर लॉगिन करावं लागणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी नऊ अंकी रोल नंबर, जन्म तारीख आणि मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.

आयआयटी कानपूरने 18 मे रोजी दोन शिफ्टमध्ये आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड 2025 परीक्षा घेतली. जेईई अॅडव्हान्स्ड पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, पेपर 2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत घेण्यात आला. यावर्षी जेईई अॅडव्हान्स्डसाठी एकूण 1,87,223 उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा घेतल्यानंतर, आन्सर की जाहीर करण्यात आली होती. MHT CET Result 2025: एमएचटी सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुपचे निकाल cetcell.mahacet.org वर लवकरच होणार जाहीर; जाणून घ्या कसं पहाल स्कोअरकार्ड .

JEE Advanced 2025 Result कसा पहाल ?

  • JEE Advanced 2025 ची अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in ला भेट दया.
  • होम पेज वर JEE Advanced result link वर क्लिक करा.
  • आता JEE Advanced 2025 साठीचा तुमचा रोल नंबर, जन्म तारीख (DD/MM/YYYY फॉर्मेट मध्ये) आणि 10 अंकी रजिस्टर फोन नंबर टाकून सबमीट करा.
  • JEE Advanced 2025 result आता तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
  • निकाल पाहून तुम्हाअंला तो डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.

रजित गुप्ता टॉपर

आज जाहीर झालेल्या निकालामध्ये कोटा चा रजित गुप्ता टॉपर आहे. त्याला All India Rank – 1 आहे. 360 पैकी त्याने 332 गुण मिळवले आहेत.

जेईई अ‍ॅडाव्हान्सचा निकाल आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्था (जीएफटीआय) सारख्या देशातील अव्वल अभियांत्रिकी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशात JEE Advanced counselling 2025 आणि seat allotment processes मध्ये निर्णायक भूमिका बजावतील. परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी JoSAA counselling process मध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यासाठी नोंदणी 3 जून 2025 पासून सुरू होईल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).