IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल मध्ये 482 जगांसाठी नोकर भरती, 12 वी पास उमेदवार ही अर्जासाठी ठरणार पात्र

Indian Oil (Photo Credits-Facebook)

IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 482 पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरती अंतर्गत मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन अॅन्ड इंस्ट्रुमेंट, एचआर, अकाउंट्स आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ICOL मध्ये ऑपरेटिंग पदांसाटी इच्छुक असलेल्या उमेदावारांना अर्ज करता येणार आहे. नोकर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया येत्या 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.(OBC Reservation In Sainik Schools: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! देशातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण)

इंडियन ऑइल मधील नोकर भरतीसाठी 12 वी पास उमेदवार ही पात्र ठरणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी iocl.com या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवावी. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे. तर आयओसीएस मधील नोकर भरतीबद्दल येथे अधिक माहिती जाणून घ्या.(Business Ideas For Unemployed People: नोकरी गेली? नो टेन्शन! बेरोजगार महिला, पुरुषांसाठी 10 बिझनेस आयडिया)

>>पदाचे नाव आणि रिक्त जागा-

टेक्निशियन अपरेंटिस मॅकॅनिकल-145 पद

टेक्निशियन अपरेंटिस इलेक्ट्रिकल-136 पद

टेक्निशियन अपरेंटिस टेलिकम्युनिकेशन अॅन्ड इंस्ट्रुमेंटेशन-121 पद

ट्रेड अपरेंटिस असिस्टेंट ह्युमन रिसोर्स-30 पद

ट्रेड अपरेंटिस असिस्टेंट (अकाउंटेड)-26 पद

डेटा एन्ट्री ऑपरेटर (फ्रेशर अपरेंटिस)-13 पद

डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर्स)-11 पद

>>शैक्षणिक योग्यता-

ICOL मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती करिता शैक्षणिक योग्यता वेगवेगळी आहे. ज्यामध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी 12 वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

>>वयाची अट-

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्ष असावे.

>>ट्रेनिंग कालावधी-

टेक्निशियन अपरेंटिस (Elec/Mech/T&I)- 1 वर्ष

ट्रेड अपरेंटिस (Assistant HR/Account)-1 वर्ष

डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि डॉमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर- 15 महिने

या नोकर भरतीसाठी निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.