Indian Post Job Recruitment: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, इंडिया पोस्ट कडून मेगाभरतीची घोषणा
भारतीय टपाल विभागानं 90 हजारहून अधिक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या मेगाभरतीत पोस्टमन, मेल गार्डसह विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.
हल्ली मोठ्या प्रमाणावर तरुण नोकरीच्या (Job) शोधात आहेत. तसेच खासगी क्षेत्रात नोकरीसाठी (Private Jobs) मोठी स्पर्धा आहे शिवाय त्या नोकरीची लांब कालवधीची हमी देखील कमी असते. म्हणून सरकारी नोकरी (Government Jobs) मिळालेली सर्वोत्तम. पण सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी हवी असल्यास त्यासाठी पदव्युत्तर (Graduation) शिक्षण किंवा विशेष प्रवेश परिक्षा (Entrance Exam) द्याव्या लागतात पण आता दहावी (SSC) पास विद्यार्थांना देखील सरकारी कार्यालयात (Government Job) नोकरीची संधी (Job Opportunity) आहे. इंडिया पोस्टमध्ये दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडिया पोस्टमध्ये हजारो पदांची मेगाभरती जाहिर करण्यात आली आहे. तरी यासाठी नोंदणी प्रक्रीया, शैक्षणिक पात्रता, पगार किती असेल हे जाणून घेवूया.
भारतीय टपाल विभागानं 98 हजार 83 पदांसाठी रिक्त जागा जाहीर (Recruitment Announcement) केल्या आहेत. या मेगाभरतीत पोस्टमन (Postman), मेल गार्डसह (Male Guard) विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. तरी पदभरतीसाठी पदांच्या पात्रतेनुसार दहावी (SSC), बारावी (HSC) किंवा पदवीधर (Graduate) असणं अनिवार्य आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षे दरम्यान असावे. तरी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलत दिली जाईल. (हे ही वाचा:- SBI Job Opportunity: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, करा आजचं अर्ज)
भारतीय टपाल (India Post) विभागाच्या नोकर भरतीसाठी उत्सुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत साइटवर या भरती मोहिमेशी संबंधित माहिती तपासू शकतात. तरी या संकेतस्थळापवर अर्ज दाखल करण्यासंबंधीत सविस्तर माहिती दिली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर आहे. तरी अर्ज (Application for Job) दाखल करण्यासाठी कुठलाही शुल्क भरण्याची गरज नाही. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे अर्ज पात्रतेच्या आधारावर निवडल्या जातील. निवडक अर्ज उमेदवारांना निवड कौशल्य चाचणी द्यावी लागेल. तसेच निवडलेल्या उमेदवारांना झालेल्या पदभरती प्रमाणे नियमानुसार वेतन (Payment) दिलं जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)