ICAI CA January 2025 च्या Foundation Course परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल; इथे पहा नव्या तारखा

जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्स Intermediate Examination च्या वेळापत्रकात बदल होणार नाहीत.

Examinations | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Institute of Chartered Accountants of India कडून च्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. Foundation course examination साठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. हे बदल ICAI ची अधिकृत वेबसाईट icai.org वर देण्यात आले आहेत.

अधिकृत नोटीशी नुसार, आता Foundation course च्या परीक्षेच्या तारखे मध्ये मकर संक्रांतीच्या सुट्टीमुळे बदल करण्यात आले आहेत. 14 जानेवारीची परीक्षा आता 16 जानेवारी 2025 ला होणार आहे. Foundation course examination ची परीक्षा 12,16 आणि 18, 20 जानेवारी 2025 दिवशी होणार आहे.

फाऊंडेशन कोर्स पेपर 1 आणि पेपर 2 हे दुपारी 2 ते 5 दरम्यान होणार आहेत तर पेपर 3, आणि पेपर 4 हे दुपारी 2 ते 4 मध्ये होणार आहेत. Intermediate course चे पेपर आता सारे दिवस दुपारी 2 ते 5 दरम्यान होणार आहेत. Foundation Examination चे पेपर 3 आणि 4 साठी आगाऊ पेपर वाचवण्याच्या वेळे विना होणार आहेत. तर बाकी सार्‍या पेपर्स साठी 15 मिनिटांचा आगाऊ वेळ देखील दिला जाणार आहे. त्यामुळे पेपर 1.45 ला दिले जातील आणि विद्यार्थी 2 वाजेपर्यंत पेपर वाचू शकतील.

जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्स Intermediate Examination च्या वेळापत्रकात बदल होणार नाहीत. Intermediate कोर्सची परीक्षा ग्रुप I साठी 11, 13 आणि 15 जानेवारी आणि ग्रुप II साठी 17, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी घेतली जाईल.

दरम्यान वर नमूद केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकातील कोणताही दिवस केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार/स्थानिक प्राधिकरणाने सार्वजनिक सुट्टी घोषित केल्यास परीक्षेचे वेळापत्रक बदलणार नाही. अधिक संबंधित माहितीसाठी ICAI ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.