CA Foundation June 2023 Results कधी लागणार? ICAI कडून याबाबतची महत्त्वाची अपडेट जारी!

Chartered Accountancy Foundation examination जून महिन्यात 24, 26, 28, 30 जून दिवशी झाली आहे.

Result | Representative image (Photo Credit- Pixabay)

ICAI कडून CA Foundation Exam 2023 च्या तारीख आणि वेळेची घोषणा करण्यात आली आहे. ICAI CA Foundation results सोमवार 7 ऑगस्ट दिवशी रात्री 9 च्या सुमारास किंवा 8 ऑगस्ट दिवशी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाईट icai.nic.in वर हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची आतुरतेने प्रतिक्षा आहे. याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे.

Chartered Accountancy Foundation examination जून महिन्यात 24, 26, 28, 30 जून दिवशी झाली आहे. आता या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचे अपडेट्स वेबसाईटवर पहायला मिळतील.

ICAI CA Foundation June 2023 Results कसा पहाल ऑनलाईन?

दरम्यान अद्याप निकाल जाहीर न झाल्याने त्याचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी वेबसाईट वर लक्ष ठेवा. 7-8 ऑगस्ट दरम्यान कधीही निकाल वेबसाईट वर लाईव्ह केला जाऊ शकतो.