IBPS Clerk Prelims Result 2020: आयबीपीएस क्लार्क परीक्षेचा आज निकाल होणार जाहीर; Ibps.in वर असा पहा

त्यांचे निकाल आज जाहीर होतील.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

आयबीपीएस म्हणजेच The Institute of Banking Personnel Selection च्या यंदाच्या प्रिलिम्स परीक्षांचा निकाल आज (31 डिसेंबर) जाहीर होणार आहे. यंदा या परीक्षा 23 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर 2020 दिवशी पार पडल्या होत्या. दरम्यान जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, IBPS Clerk Prelims Result 2020 हा अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच ibps.in वर जाहीर केला जाईल. हा निकाल जाहीर होताच पात्र विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी परवानगी मिळेल. नक्की वाचा: ESIC Recruitment 2020: ईएसआयसीकडून प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती जाहीर; 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज.

IBPS Clerk Prelims Result 2020 कसा पहाल?

यंदा आयबीपीएस च्या मेन्स परीक्षेचे आयोजन 24 जानेवारी 2021 मध्ये करण्यात आलं आहे. तर त्याचा निकाल एप्रिल 2021 मध्ये जाहीर केला जाणार आहे. ibps.in च्या माहितीनुसार,Institute of Banking Personnel Selection मेंस परीक्षा 4 सेक्शनमध्ये होईल. यामध्ये General/ Financial Awareness, General English, Reasoning Ability & Computer Aptitude आणि Quantitative Aptitude यांचा समावेश असेल. ही 200 गुणांची परीक्षा असेल. अंतिम मेरीट लिस्ट बनवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मेन्स परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत.