HSC Board Exam Results 2019: बारावी बोर्ड फेरपरिक्षेचा अर्ज भरण्यासाठी 3 जूनपासून होणार सुरुवात
तर आता जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेरपरिक्षेसाठी (Re-Exam) 3 जून पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे.
28 मे रोजी बारावी बोर्ड परिक्षेचा (HSC Board Exam) निकाल जाहीर करण्यात आला. तर आता जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेरपरिक्षेसाठी (Re-Exam) 3 जून पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जून ठेवण्यात आली असून नियमित शुल्क भरावे लागणार आहेत. मात्र अर्ज भरण्यास वेळ केल्यास त्यावर अतिरिक्त शुल्क स्विकारला जाणार असल्याने त्याची शेवटची तारीख 19 जून ठेवण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी असे म्हटले आहे की, फेरपरिक्षेसाठीचे अर्ज विद्यार्थ्यांनी ज्युनिअर महाविद्यालयांच्या सहाय्याने भरावे. तसेच अर्ज भरताना मुख्य परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याची परिक्षा माहिती अर्जात ऑनलाईन पद्धतीमध्ये दिसणार आहे. त्याचसोबत श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट 2019 आणि फेब्रुवारी-मार्च 2020 या वेळी होणाऱ्या परिक्षेसाठी बसण्याची संधी मिळणार आहे.(बारावी बोर्ड परिक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी विद्यार्थ्यांना 400 रुपये मोजावे लागणार?)
त्याचसोबत विद्यार्थ्यांनी अर्ज हे वेळत भरावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अर्ज भरण्यास वेळ लावल्यास मुदतवाढ मिळणार नसल्याचे आधीच शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.