Maharashtra Student Protest: गृहमंत्र्यांनी दिले आंदोलनाच्या चौकशीचे आदेश, विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक भडकवण्याचा प्रयत्न

त्यामुळे आंदोलनाच्या चौकशीचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्याचे समजते. पोलिसांकडूनही तपासासाठी पथके तैनात केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा बनलेल्या ऑयकान हिंदुस्थानी भाऊला आता अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Student Protest & Dilip Walse-Patil (Photo Credit - ANI & FB)

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात, या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी (Maharashtra Student Protest) आंदोलन केले. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी तसे आदेश दिले आहे. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून राज्यभरात जोरदार विरोध करण्यात आला. आज मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या धारावीतील घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाण मांडले होते. परीक्षेला एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनामुळे राज्यात वातावरण तंग झाले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या चौकशीचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्याचे समजते. पोलिसांकडूनही तपासासाठी पथके तैनात केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा  बनलेल्या ऑयकान हिंदुस्थानी भाऊला आता अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले गृहमंत्री?

तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांना असलेल्या प्रश्नांसंदर्भात भूमिका मांडायची होती, तर त्यांनी ती राज्य सरकारसमोर मांडायला हवी होती, असं गृहमंत्री म्हणाले. तसंच विद्यार्थी स्वतःहून रस्त्यावर आल्याचं आपल्याला वाटत नाही. यामागे कोणीतरी आहे. जाणीवपूर्वक विद्यार्थांना आंदोलन करायला लावलंय, अशी शक्यता व्यक्त करत आपण पोलीस विभागाला चौकशीचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (हे ही वाचा सुपरमार्केटमध्ये Wine विक्रीच्या सरकारच्या निर्णयाला Anna Hazare यांचा विरोध; म्हणाले- 'यामुळे व्यसनाधीनता वाढेल')

गेल्या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना भडकवण्यासाठी जे व्हिडिओ व्हायरल झाले, त्याचा तपास केला जाईल. मुंबई, पुणे आणि नागपुरात आंदोलन करायचे, हे व्हिडिओंमधून सांगण्यात आले. हे ठरवून कोणत्यातरी संघटनेने केलेले कृत्य आहे. याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करु. तर परीक्षा ऑनलाईन घ्यायची की नाही यासंदर्भात शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील. विद्यार्थ्यांनी शांतपणे अभ्यास करावा. सरकारला तुमच्या हिताची काळजी आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

वर्षा गायकवाड यांचं आंदोलन संघटनांना चर्चेचं आवाहन

मुंबईतील धारावी येथे मोठ्या संख्येने शाळकरी मुले जमली होती. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड  यांनी विविध संघटनांना चर्चेच आवाहन केले आहे. शालेय मुलांना रस्त्यावर आणणे चुकीचे आहे, असे प्रत्युत्तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. आम्ही दोन वर्षे ऑनलाइन अभ्यास केला. त्यामुळे आता आम्हीही ऑनलाइन परीक्षा द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थी संघटना करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विद्यार्थी संघटनांनी शाळकरी मुलांना एकत्र बोलावल्याचे चित्र दिसुन आले आहे.