Google Placement: 16 महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला, गूगलने दिली थेट नोकरी

ज्यामुळे तो जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. स्टॅनली झोंग असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

US College Admission: एकदोन नव्हे तर तब्बल 16 महाविद्यालयांनी प्रवेश नाकारलेल्या एका तरुणास गूगलने थेट नयुक्ती (Google Placement) दिल आहे. ज्यामुळे तो जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. स्टॅनली झोंग असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो पालो अल्टो येथील राहणारा आहे. नुकताच तो गन हायस्कूलमधून पदवीधर झाला. इतकेच नव्हे तर त्याने स्कॉलॅस्टिक असेसमेंट टेस्ट (SAT) मध्ये 1600 पैकी 1590 गुण मिळवले. त्याने दमदार कामगिरी करत अगदी वर्षभरात स्वत:चे स्टार्टअपही सुरु केले. मात्र, त्याला पुढील शिक्षणासाठी 18 पैकी 16 महाविद्यालयांनी प्रवेश द्यायला नकार दिला. शेवटी त्याला टेक जायंट Google ने त्याची नियुक्ती केली.

ABC7 चा हवाला देत एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात, स्टॅनली झोंग याची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, ठीक आहे. हे अपेक्षित होते. तुम्ही जे ऐकले वाचले ते बरोबर आहे. मला एक चांगली संधी मिळाली. वाचकांच्या माहितीसाठी असे की, झोंगला Google मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून पूर्णवेळ नोकरी मिळाली. या आठवड्यात त्याने नवीन नोकरीवर रुजी देखील झाला.

झोंग याचा निकटवर्तीय आणि हाऊस कमिटी ऑन एज्युकेशन आणि वर्कफोर्सच्या सुनावणीत साक्ष देणाऱ्या एकाने सांगितले की, न्यायालयाने सकारात्मक आदेश देऊनही कारात्मक कारवाईवर बंदी घालणारा निर्णय विद्यापीठ धोरणे, स्टॅनली झोंग यांना गोंधळात टाकणारी धोरणे कशी तयार करत आहे याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, विद्यार्थ्याला टेक्सास विद्यापीठ आणि मेरीलँड विद्यापीठाने स्वीकारले. त्याने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये नावनोंदणी करण्याचा निर्णय घेतला, परंतु जेव्हा त्याला Google नोकरीची ऑफर मिळाली तेव्हा ते थांबवले. स्टॅनलीने आउटलेटला सांगितले की तो अजूनही रात्री कॉलेजमध्ये प्रवेश घेतो, परंतु सध्या, किशोर कॉलेज कॅम्पसमध्ये नव्हे तर गुगल कॅम्पसमध्ये आनंद घेत आहे.