FYJC Admission 2022-23: 11 वी प्रवेशाची पहिली प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट आज; जाणून घ्या इथे संपूर्ण वेळापत्रक
त्यानंतर 6 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करून संबंधित कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.
FYJC Admission 2022-23 Schedule: महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचे (SSC Board) निकाल लागून महिना ओलटला तरीही आयसीएसई (ICSE) आणि सीबीएससी (CBSE) बोर्डाचा 10वीचा निकाल लागू शकला नसल्याने यंदा 11वी प्रवेशप्रक्रिया (FYJC Admission) रेंगाळली होती. मात्र आता या प्रवेशप्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आज (28 जुलै) 11वी प्रवेशप्रक्रियेसाठी प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. तर 3 ऑगस्टला पहिली मेरीट लिस्ट जारी केली जाणार आहे. आज सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाऊंट मध्ये पहिल्या सर्वसाधारण यादीनुसर कुठे प्रवेश मिळेल याचा अंदाज येणार आहे.
कसं असेल यंदाचं 11वी प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक?
पहिली सर्वसाधारण यादी - 28 जुलै सकाळी 10 वाजता
पहिली मेरीट लिस्ट आणि प्रवेश - 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट
दुसरी मेरीट लिस्ट (संभाव्य) - 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट
तिसरी मेरीट लिस्ट (संभाव्य) - 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट
विशेष फेरी (संभाव्य) - 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर
दरम्यान 3 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंती क्रमानुसार कॉलेजसाठी प्रवेश जाहीर केले जाणार आहेत. त्यानंतर 6 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करून संबंधित कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर 7 ऑगस्टला दुसर्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी अपडेट केली जाणार आहे. नक्की वाचा: Educational Loans: अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज; जाणून पात्रता व कुठे कराल अर्ज .
11thadmission.org.in या अधिकृत संकेतस्थळावर मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागामध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. दोन भागांमध्ये फॉर्म भरून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रवेश प्रक्रियेत एक लाख ७६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली केली आहे. आता यामधून फॉर्मचे दोन्ही पार्ट यशस्वीरित्या भरलेल्यांचा विचार केला जाणार आहे.