FYJC 2025 Admission Schedule Revised: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; पहिली यादी 10 ऐवजी 26 जूनला

आता नव्या वेळापत्रकानुसार, पहिली मेरीट लिस्ट 26 जून आणि दुसरी मेरीट लिस्ट 5 जुलै दिवशी जारी केली जाणार आहे.

Online | Photo Credit: Pixabay.com

School Education and Sports Department of Maharashtra कडून आता अकारावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी दहावीचा निकाल लागला आहे. मात्र अजूनही अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये कॉलेज अ‍ॅडमिशन सुरू न झाल्याने पालक, विद्यार्थी वैतागले आहेत. नव्या वेळापत्रकानुसार आता आज 10 जूनला काहीर होणारी पहिली लिस्ट 26 जूनला जाहीर केली जाणार आहे. तर 8 जूनला जारी होणारी Maharashtra FYJC Admission 2025 final merit list 11 जून दिवशी प्रसिद्ध होणार आहे. 6 जून दिवशी first provisional merit list जारी करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना फायनल लिस्ट तयार होण्यापूर्वी आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.

पूर्वीच्या तारखांनुसार, विभाग 8 जून रोजी FYJC final merit list 2025 जाहीर करणार होते. अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्यानंतर विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला.84,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी दावा केला की त्यांनी FYJC अर्जाचा भाग 1 पूर्ण केला आहे परंतु भाग 2 पूर्ण करू शकले नाहीत किंवा भाग 2 लॉक झाला आहे. त्यांना सामावून घेण्यासाठी, विभागाने फॉर्मचा भाग 2 भरण्याची अंतिम मुदत 6 आणि 7 जून रोजी दुपारी 12.30 पर्यंत वाढवली.

आता नव्या वेळापत्रकानुसार, पहिली मेरीट लिस्ट 26 जून आणि दुसरी मेरीट लिस्ट 5 जुलै दिवशी जारी केली जाणार आहे. इथे पहा सुधारित वेळापत्रक .

कशी पहाल 2025 General Merit List ?

  • mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • होमपेज वर ‘Maharashtra FYJC Admission 2025 General Merit List’ वर क्लिक करा.
  • आता तुमचे लॉगिन डिटेल्स टाका.
  • स्क्रिन वर लिस्ट पहा.
  • आता यादी डाऊनलोड करा

अकरावीच्या या प्रवेश प्रक्रियेत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील 9281 ज्युनियर कॉलेज मध्ये 20 लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यंंदा कोकण विभागीय मंडळ वगळता अन्य सर्व मंडळांमध्ये ऑनलाईन माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement