Financial Management: आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी करा हे तीन रामबाण उपाय! जे तुम्हाला अडचणीच्या काळात करतील मोलाची मदत

अचानक नोकरी गेल्याने, काहींना मेडिकल कारणामुळे, तर काहींना इतर काही कारणांमुळे आर्थिक आव्हानांचा, टंचाईचा सामना करावा लागतो. अशा वेळी आगोदर योग्य पद्धतीने आर्थिक व्यवस्थापन (Financial Management) केलेले असेल तर, आव्हानांचा सामना यशस्वीपणे पार करता येतो

Financial Management | (Photo credit: archived, edited, symbolic images)

आयुष्यात पैशांची अडचण केव्हाई येऊ शकते. आर्थिक गरज ही सांगूण येत नाही. अनेकदा अशा काही घडना घडतात की, लोक आर्थिक गर्तेत फसत जातात. त्यामुळे भविष्यातील धोके ओळखून संकटांचा सामना करण्यासाठी वेळीच जर पावले टाकली तर, आर्थिक आव्हानांचा सामना यशस्वी रित्या करता येतो. अचानक नोकरी गेल्याने, काहींना मेडिकल कारणामुळे, तर काहींना इतर काही कारणांमुळे आर्थिक आव्हानांचा, टंचाईचा सामना करावा लागतो. अशा वेळी आगोदर योग्य पद्धतीने आर्थिक व्यवस्थापन (Financial Management) केलेले असेल तर, आव्हानांचा सामना यशस्वीपणे पार करता येतो. ही आव्हाने पेलण्यासाठी अवलंबा जीवन विमा योजना (Life Insurance Scheme),आरोग्य विमा (Health Insurance), आणीबाणी निधी ( Emergency Fund) हे तीन रामबाण उपाय.

जीवन विमा योजना (Life Insurance Scheme)

आपण आपले आयुष्य कितीही सुरक्षीत जगण्याचा प्रयत्न केला तरी, कोणती घटना कधी घडेल काहीच सांगता येत नाही. सगळाच अनिश्चिततेचा खेळ. अशा वेळी लाईफ इन्शूरन्स (Life Insurance Scheme) आपल्या कामी येऊ शकतो. ज्याला मराठीत जीवन विमा योजना म्हणतात. लाईफ इन्शूरन्सच्या माध्यमातून व्यक्ती केवळ स्वत:च नव्हे तर आपल्या कुटुंबालाही सुरक्षीत करु शकतो. मार्केटमध्ये उपलब्ध असलेला कोणतीही इन्शुरन्स स्कीम कोणत्याही त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना पॉलिसी होल्डरने ठरवून दिलेली रक्कम अदा करते. ही रक्कम हजार, लाख, कोटी रुपयांच्या पटीत असू शकते. असे म्हटले जाते की, लाईफ इन्शुरन्सची रक्कम ही व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 टक्के असावी. (हेही वाचा, Form 16 मध्ये आयकर विभागाचा मोठा बदल, Tax न भरणाऱ्या पगारी कर्मचाऱ्यांना दणका)



आरोग्य विमा (Health Insurance)

आरोग्य विमा ही मोठी कामाची गोष्ट आहे. आरोग्य विमा उतरवला असेल आणि तर पॉलिसी होल्डरचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असेल. त्याच्याकडे भलेही पैसे नसतील तरीसुद्धा अशा वेळी तो व्यक्ती चांगल्या रुग्णालयात उत्कृष्ट पद्धतीची आरोग्यसेवा घेऊ शकतो. आरोग्य विमा उतरवल्याने आजारासोबत लढताना आर्थिक पाठबळ मिळते. दरम्यान, हेल्थ इन्शुरन्स खेरेदी करताना पॉलिसी बेनिफिट्स, कव्हरेज आणि प्रीमियम आदी प्रकारांची तुलना करणे आवश्यक आहे. सोबत आपल्याला भविष्यात किती रुपयांच्या कव्हरेजची गरज पडू शकते हेही ध्यानात घ्यायला हवे.


आणीबाणी निधी ( Emergency Fund)

जर तुम्ही गृहकर्ज, वाहन कर्ज, आदी प्रकारचे कर्ज घेतले असेल, क्रेडिट कार्डेचबिल बाकी असेल तर अशा स्थिती एमर्जन्सी फंड (आणीबाणी निधी) फार पायदेशीर ठरतो. फआयनान्शिअली क्रायसीसच्या वेळी असा फंड कामी येतो. हा फंड वापरण्याची वेळ कोणावर न यावी. पण, जर तशी वेळ आलीच तर आपण तयार असायला हवे. दुसरे म्हणजे समजा हा फंड तुम्ही वापरला नाही. तर, इतर ठिकाणी गुंतवणुकीसाठीही तुम्ही याचा नक्कीच विचार करु शकता.