Fake Universities in India: देशातील बोगस विद्यापीठांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर, उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्रातील एकाचा समावेश

तसेच, इतर दोन संस्थांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यांनी भारतातील बोगस विद्यापीठांची एक यादीच (Fake Universities in India) जाहीर केली.

Dharmendra Pradhan | (Photo Credit : Facebook)

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी सोमवारी (2 जुलै) माहिती दिली की, विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसी ने स्वयंघोषीत 24 विद्यापीठांना बोगस ठरवले. तसेच, इतर दोन संस्थांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यांनी भारतातील बोगस विद्यापीठांची एक यादीच (Fake Universities in India) जाहीर केली. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला धर्मेंद्र प्रधान यांनी लिखीत स्वरुपात उत्तर दिले. या उत्तरात म्हटले आहे की, विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य जनता, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांच्याद्वारे प्राप्त तक्रारींच्या आधारावर युजीसीने चौकशी केली. त्यात दोषी आढळलेल्या 24 स्वयंघोषीत विद्यापीठांना बोगस म्हणून जाहीर केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगस विद्यापीठं असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश क्रमांक एकवर आहे. उत्तर प्रदेशमध्य आठ विद्यापीठं बोगस म्हणून जाहीर झाली आहेत. या विद्यापीठांमध्ये वाराणसी संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी, महिला ग्राम विद्यापीठ, इलाहाबाद, गांधी हिंदी विद्यापीठ, इलाहाबाद, नेशनल यूनिवर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होम्योपैथी, कानपुर, नेताजी सुभाष चंद्र बोस मुक्त विश्वविद्यालय, अलीगढ, उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, मथुरा, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगढ, इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, नोएडा आदी विद्यापीठांचा समावेश आहे.

राजधानी दिल्ली मध्येही एकूण सात विद्यापीठं बोगस ठरली आहेत. यात कमर्शियल यूनिवर्सिटी लिमिटेड, संयुक्त राष्ट्र विश्वविद्यालय, व्यावसायिक विश्वविद्यालय, एडीआर केंद्रित न्यायिक विश्वविद्यालय, भारतीय विज्ञान और इंजीनियरिंग संस्थान, विश्वकर्मा मुक्त विश्वविद्यालय, आध्यात्मिक विश्वविद्यालय आदी विद्यापीठांचा समावेश आहे. (हेही वाचा, स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु ठेवण्यात मदत करणाऱ्या नाशिकच्या कम्युनिटी रेडिओ केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार)

ओडीशा आणि पश्चिम बंगाल राज्यात प्रत्येकी दोन विद्यापीठं बोगस आहेत. पश्चिम बंगालमध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, कोलकाता आणि इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन एंड रिसर्च, कोलकाता ही दोन विद्यापीठे बोस आहेत. तर ओडीशामध्ये नवभारत शिक्षा परिषद, राउरकेला आणि नॉर्थ उडीसा यूनिवर्सिटी ऑफ एग्रीकल्चर एंड टेक्नोलॉजी ही विद्यापीठं बोगस आहेत.

कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि पुडुचेरी राज्यांमध्ये प्रत्येकी एक विद्यापीठ बोगस आहे. ही विद्यापीठे खालील प्रमाणे

दरम्यान, विनामान्यता प्राप्त विद्यापीठांविरोधात यूजीसीद्वारा कठोर पावले उचलण्यात आली. याबाबत बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, जेव्हा कोणतीही स्वयंघोषीत संस्था युजीसी अधिनियम 1956 चे उल्लंघन करते किंवा कार्य करत असल्याचे निदर्शनास येते तेव्हा युजीसी राष्ट्रीय हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमांतून बोगस विद्यापीठ/संस्थांची यादी सार्वजनीक रुपात नोटीस प्रसिद्ध करुन जाहीर करते.