Extension in Class 11th Online Admission : इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ, पाहा कुठे करायचा अर्ज
यानंतर या शैक्षणिक वर्षासाठी आकरावी प्रवेशासाठी संधी असणार नाही, असेही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
काही अपरिहार्य कारणांमुळे इयत्ता 11वी ( 11th Class) वर्गासाठी प्रवेश घेऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा दिलासा म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी यंदाची शेवटची संधी असणार आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ (Extension in Class 11th Online Admission) देण्यात आली आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. शाळा महाविद्यालयं तर प्रदीर्घ काळ बंदच होती. आता कुठे हळूहळू शाळा कॉलेज सुरु होताना दिसत आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी साठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांना Participate in FCFS मधून अर्ज करवे लागतील. त्यासाठी Allotment घेण्यासाठी 16 फेब्रुवारी 2021 च्या रात्री 10 वाजेपर्यंत मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांना Allotment मिळेल त्यांना विद्यालयातील प्रवेश निश्चित करता यावा यासाठी 16 फेब्रुवारीच्या सायंकाळी 06 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (हेही वाचा, School Fees: शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याच्या निर्णयामध्ये सध्या तरी हस्तक्षेप करू शकणार नाही; शालेय शिक्षण विभागाची महत्वाची माहिती)
ज्या विद्यार्थ्यांना आपले प्रवेश रद्द करायचे आहेत त्यांना आपले प्रवेश 15 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 पर्यंत मुदत आहे. ही शेवटचीच संधी आहे. त्यामुळे इच्छुक आणि याआधी संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीकडे दुर्लक्ष करु नये. आपला प्रवेश वेळतच निश्चित करावा. कारण सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी ही शेवटची संधी असणार आहे. यानंतर या शैक्षणिक वर्षासाठी आकरावी प्रवेशासाठी संधी असणार नाही, असेही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.