Engineering Books in Marathi: आता अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीमध्ये; महाराष्ट्र राज्य 14 नोव्हेंबरला लाँच करणार पुस्तके
मूळ अभियांत्रिकी पाठ्यपुस्तके, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्राध्यापकांनी इंग्रजीत लिहिलेली आहेत, ती AICTE ने अनुवादित आणि प्रकाशित केली आहेत.
गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एमबीबीएससाठी (MBBS) हिंदीमध्ये पाठ्यपुस्तके लाँच केल्याने एक डोमिनो इफेक्ट सुरू झाला आहे. आता भारतीय राज्यांनी एकामागून एक, त्यांच्या प्रादेशिक भाषेत उच्च शिक्षण देण्याच्या योजना सुरु केल्या आहेत. पुढील आठवड्यात महाराष्ट्र अधिकृतपणे या लीगमध्ये सामील होणार आहे. 14 नोव्हेंबरला अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना मराठी पाठ्यपुस्तकांचा पहिला संच मिळणार आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठरवल्यानुसार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचालनालय आणि राज्य सरकारचे अधिकारी 14 नोव्हेंबर रोजी या STEM अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षांसाठी 20 मराठी पाठ्यपुस्तकांचे उद्घाटन करणार आहेत.
याबाबत DTE चे संचालक डॉ. अभय वाघ म्हणाले, ‘जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिकतात, तेव्हा ते संकल्पना अधिक वेगाने समजून घेतात.’ विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा एक प्रमुख घटक म्हणून ठळक केले गेले आहे. (हेही वाचा: Medical Education In Marathi: 2023 शैक्षणिक वर्षापासून MBBS सह वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतूनही घेण्याचा पर्याय!)
मूळ अभियांत्रिकी पाठ्यपुस्तके, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्राध्यापकांनी इंग्रजीत लिहिलेली आहेत, ती AICTE ने अनुवादित आणि प्रकाशित केली आहेत. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांना या पुस्तकांचा एक संच मिळणार आहे. डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी एकूण 11 पाठ्यपुस्तके आणि पदवीधरांसाठी नऊ पुस्तके अनुवादित केली आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमबीबीएस प्रथम वर्षाच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन केले. मध्य प्रदेशातील सर्व 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऍनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे तीन एमबीबीएस विषय हिंदीमध्ये शिकवले जातील. अनेक वर्षांपूर्वी हा उपक्रम अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाने सुरू केला होता.