Education In Hindi: विद्यार्थांसाठी मोठी बातमी! वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण आता हिंदी भाषेतून
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण आता इच्छुक विद्यार्थ्यांना हिंदी भाषेतून देखील घेत येणार आहे.
पदवी (Graduation) तसेच पद्युत्तर (Post Graduation) वैद्यकीय (Medical) आणि अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण (Education) संपूर्ण देशभरात फक्त इंग्रजी (English) भाषेतून दिल्या जातं. पण आता हिंदी (Hindi) भाषेतून हे शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ते सहज शक्य होणार आहे. बरेच विद्यार्थ्यांची शिक्षण पात्रता असुनही केवळ इंग्रजी भाषेवर आवश्यक तेवढ प्रभुत्व नसल्याने त्यांना या शिक्षणापासून मुकावं लागतं. पण आता यावर मार्ग काढत हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण आता वैद्यकीय (Medical Education) आणि अभियांत्रिकी शिक्षण (Engineering Education) हिंदी भाषेतूनही घेता येणार आहे. देशातील मध्य प्रदेश हे पहिलं राज्य असणार आहे जिथे हिंदी भाषेतून वैद्यकीय शिक्षण दिल्या जाणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते भोपाळमध्ये (Bhopal) वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ (medical education in Hindi) करण्यात येणार आहे. हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शाह यांच्या हस्ते होणार आहे.
तर पुढील वर्षीपासून उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) देखील वैद्यकीय शिक्षणासह (Medical Education) अभियांत्रिकी शिक्षण (Engineering Education) देखील हिंदी भाषेतून दिल्या जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath) आदित्यनाथ यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. म्हणजे मध्य प्रदेशनंतर (Madhya Pradesh) उत्तर प्रदेश हे देशातील हिंदी भाषेतून शिक्षण देणार दुसरं राज्य असणार आहे. तरी विद्यार्थ्यांसह पालकांकडून सरकारच्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (हे ही वाचा:- Byju’s to Fire Employees: ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी 'बायजू' 2,500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी घेतला निर्णय)
हिंदी भाषिक राज्य जर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण हिंदी भाषेतून देण्याचा निर्णय घेवू शकतं. तर महाराष्ट्र राज्य देखील याप्रकारे पदवी किंवा पद्युत्तर शिक्षण महाराष्ट्राची मातृभाषा मराठीतून देण्याचा विचार करु शकत का या चर्चांना आता उधाण आलं आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्याने घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे. तरी महाराष्ट्राती विद्यार्थ्यांच्या मागणी असल्यास मराठी भाषेतून अभ्यासक्रमाचा सरकार नक्कीच विचार करेन अशी शक्यता नाकारता येत नाही.