Coronavirus: विद्यापीठ पदवीच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत शिक्षण मंत्रालयाचे स्पष्ट निर्देश

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले आहे की, शेवटच्या वर्षाच्या परीक्षा आयोजित करताना विद्यापीठांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही गोष्टी लादू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची मनमानी करु नये

Education | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Ministr) आणि यूजीसी (UGC) द्वारा देशभरातील सर्व विद्यापीठांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी अंतिम वर्षात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात. परीक्षा घेत असताना सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांना इतर सर्व सेवा सुविधा मिळतील याची काळजी घ्यावी असेही या निर्देशांमध्ये म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले आहे की, शेवटच्या वर्षाच्या परीक्षा आयोजित करताना विद्यापीठांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही गोष्टी लादू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची मनमानी करु नये.

युजीसीने विद्यापीठांना दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, प्रत्यक्षा अथवा ऑनलाईन, ऑफलाईन, ओपन बुक अथवा ज्या कोणत्या प्रकारे घेता येईल त्या पद्धतीने घ्या. पण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या. परीक्षा घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले आहे की, भविष्यात कोणी विद्यार्थ्यांना हे विद्यार्थी कोवीड प्रमोटेड आहेत किंवा हे विद्यार्थी विनापरीक्षा पास झाले आहेत, असे म्हटलेले आम्हाला आवडणार नाही. असे घडले तर विद्यार्थ्यांच्या करीअरला मोठा धक्का बसू शकतो, आयएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, MPSC Exam: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या)

दरम्यान, परीक्षेच्या मुद्द्यावरुन सुमारे 118 विद्यापीठांनी यूजीसीला आपले उत्तर पाठवले आहे. यात देशभरातील 209 विविध विद्यापीठांनी म्हटले आहे की, ते आपल्या संस्थात्मक परीक्षा यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घेतल्या आहेत. याशिवाय 394 विद्यापीठांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन आणि संमिश्र मार्गांचा वापर करत परीक्षेची करत असल्याचे म्हटले आहे. देशभरातील सुमारे सर्व केंद्रीय विद्यापीठांनी शेवटच्या वर्षांच्या परीक्षा घेण्यास सहमती दर्शवली आहे.

देशभरातील केंद्रीय विद्यापीठांबाबत बोलायचे तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षांच्या विषयी 51 केंद्रीय विद्यापीठांकडून सरकारला सकारात्मक उत्तर आले आहे. यातील अनेक केंद्रीय विद्यापीठांनी अंतिम वर्षांच्या आणि शेवटच्या सेमीष्टरच्या ऑनलाईन परीक्षा पूर्ण केल्या आहेत. यात अनेक केंद्रीय विद्यापीठांनी 30 सप्टेंबर पूर्वी परीक्षा घेण्याचे अश्वासन दिले आहे.