DRDO Apprentice Recruitment 2021: डीआरडीओ मध्ये अपरेंटिसच्या 79 पदांसाठी नोकर भरती, 'या' पद्धतीने करा अर्ज

त्यामुळे अर्ज करण्याची अखेरची तारीख 17 मे 2021 आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

DRDO Apprentice Recruitment 2021: डिफेंस रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन मध्ये अपरेंटिस पदासांठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज करण्याची अखेरची तारीख 17 मे 2021 आहे. अशातच ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी डीआरडीओची अधिकृत वेबसाइट drdo.gov.in च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. या नोकर भरतीमध्ये 79 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी. उमेदवाराचे वय 14 वर्षांहून कमी नसावे. या व्यतिरिक्त आरक्षित वर्गसाठी उमेदवारांना नियमांनुसार सूट दिली जाणार आहे.

अपरेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम NAPS च्या पोर्टलची अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org ला भेट द्यावी. त्यानंतर पेजच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या रजिस्टर लिंकवर क्लिक करावे. उमेदवारांनी नोकर भरती संबंधित सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र स्कॅन करुन पीडीएफ फाइलच्या माध्यमातून admintbrl@tbrl.drdo.in येथे पाठवावा.

उमेदवारांची निवड 10 वी आणि आयटीआय परिक्षेत मिळालेल्या गुणांनुसार केली जाणार आहे. तसेच उमेदवारांचे ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ईमेल एसएमएस आणि फोनच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, नियुक्ती प्रक्रियेसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

तसेच भारत सरकारच्या कोल इंडिया लिमिटेड सब्सिडियरी कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र येथे खाण क्षेत्रातील रुग्णालय आणि डिस्पेंरियरि मध्ये स्टाफ नर्स (ट्रेनी) टीएण्डएस ग्रेड सी च्या 56 पदांसाठी नोटीस जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 12 मे रोजी या संबंधित ही नोटीस झळकवली असून ईमेलच्या माध्यमातून अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी डब्लूसीएलची अधिकृत वेबसाइट westerncoal.in येथील अर्जाच्या माध्यमातून नोकर भरतीचा फॉर्म भरु शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे 2021 दिली गेली आहे.